देशाचा गौरव वाढविणाऱ्या कुस्तीपटूंचे हाल, तर सामान्य जनतेचे काय? : प्रा. कॉ. दहीवडे,
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / सिरोंचा : दिल्ली येथे जंतरमंतरवर एक ऐतिहासिक आंदोलन सुरु आहे. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांचे कार्यकालात जंतरमंतरवर आज पर्यंत अनेक आंदोलने झाली आहेत. कि ज्यांची गिनती करता येणे शक्य नाही. परंतु सदयास्थितीत सुरु असलेल्या आंदोलनाने एक नवीन इतिहास घडविला आहे. ज्यांनी देशाचा सन्मान वाढविला, ज्यांनी देशाचा गौरव वाढविला, जागतिक पातळीवर कुस्ती स्पर्धेत ज्यांनी ज्यांनी सुवर्ण पदके खेचुन आणली आहेत. ज्यांच्या बरोबर पंतप्रधानांनी धन्यता मानली. असे कुस्तीपटू गेल्या काही एक महिण्यापेक्षा जास्त कार्यकाळापासून यौन शोषण करणाऱ्या भाजपचे खासदार ब्रिजभूषणसिंग यांना अटक करा, या मागणीला घेऊन आंदोलने करीत आहेत. हे उघड्या डोळ्यांनी जनतेने पहिले आहे. अशा सुकुमशहा सरकारला याची जागा दाखविल्याशियाव राहणार नाही. असे प्रा. दहीवडे यांनी म्हटले आहे.
यावेळी सुनिता अगुवार, वंदना वेदी, ताराबाई कांबळे पद्मा सोयाम, शकुंतला शेट्टीवार, अपना आदेवार उपस्थित होत्या.
News - Gadchiroli