उद्या पासून लाखांदूर येथे विदर्भस्तरीय कृषीप्रदर्शनी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / लाखांदूर :
महाराष्ट्र युवक शेतकरी संघटना लाखांदूरच्या वतीने गेल्या सहा वर्षापासून लाखांदूर येथे कृषी प्रदर्शनीचे आयोजन करण्यात येत असून, यावर्षी सुद्धा ११ ते १३ फेब्रुवारी  दरम्यान नविन बस स्टाँप समोरील कृषी प्रदर्शनीच्या मैदानावर कृषी प्रदर्शन २०१९ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 
 प्रदर्शनीच्या उद्धघाटन सोहळ्याप्रसंगी आमदार बाळा काशिवार, माजी आमदार सेवक वाघाये, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे, जि.प.अध्यक्ष रमेश डोंगरे यांच्या सह आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
 या प्रदर्शनीमध्ये तालुक्यातील १०० आदर्श शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच कंपन्यामार्फत शेतकऱ्यांना आकर्षक बक्षीशे, शेती विषयक तंज्ञांची कार्यशाळा, कृषी व पशु क्षेत्रातील नामांकित कंपन्यांचा सहभाग, जिल्हातील बचत गटांचा सहभाग, भंडारा, गोंदिया, चंद्रपुर, गडचिरोली जिल्हातील शेतकऱ्यांचा सहभाग व शेतीवर आधारीत नामांकित कंपन्यांचा सहभाग राहणार आहे. 
 या प्रदर्शनीला उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढविण्याचे आवाहन संघटनेचे संस्थापक प्रियंक बोरकर, जितू सुखदेवे, धिरज राऊत, अध्यक्ष संदीप नाकतोडे, उपाध्यक्ष अमित मिसार, सचिव चक्रधर ठाकूर, सहसचिव श्रीहरी भेंडारकर, कोषाध्यक्ष रजत मोटघरे, सह कोषाध्यक्ष सुमित दखने, प्रवक्ता जितेंद्र ढोरे, व्यवस्थापक विवेक नाकतोडे, गोलू सुखदेवे, विश्वपाल हजारे, राहुल सपाटे, पीतांबर मेश्राम, आकाश दखने, विक्रम हटवार, दिनेश वासनिक, रूनेश लाडगे, मंगेश पवनकर, आशिष पाटील, पवन समरत, स्वप्नील ठेगरी, चंद्रशेखर खेडीकर, शेषराव मेश्राम व सर्व सदस्यांनी केले आहे.   Print


News - Bhandara | Posted : 2019-02-10


Related Photos