उपरी येथे मॅजिक बस नेस्ले हेल्दी किड्स कार्यक्रमाअंतर्गत थ्रो बॉल स्पर्धा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / साखरी : 
सावली तालुक्यातील जि.प.उ.प्राथ शाळा उपरी येथे मॅजिक बस इंडिया फॉउंडेशन नेस्ले हेल्दी किड्स कार्यक्रमा अंतर्गत थ्रो बॉल स्पर्धा आयोजित करण्यात आली होती .  सदर स्पर्धा सामदा, निलसनी, पेडगांव, हरांबा, डोनाळा, उपरी, कापसी येथील अकरा ते चौदा वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आली . या स्पर्धेत तेरा टिमनी सहभाग घेतला होता.  
 मॅजिक बस इंडिया फॉउंडेशन नेस्ले हेल्दी किड्स कार्यक्रम सावली तालुक्यातील तिस गावात 'खेळाच्या माध्यमातून विकास' या कार्यक्रमा अंतर्गत आरोग्य, स्वच्छता, चांगल्या पोषणाच्या सवयी, शिक्षणाचे महत्त्व, स्त्री-पुरुष समानता, खेळण्याचा अधिकार व सामाजिक भावनिक शिक्षण या कार्यक्षेत्रावर काम करीत आहे. या कार्यक्षेत्राला घेऊन अकरा ते चौदा वयोगटातील मुलामुलींना मार्गदर्शन करण्यात येतो. 
या कार्यक्रमाप्रसंगी पंचायत समिती सदस्य गणपत कोठारे, सरपंच आशीष मनबतुलवार ,उपसरपंच अनीताताई कांबळे ,प्रियंकाताई रागीट इंटरनेशनल कब्बडी प्लेअर, राजू पा शेट्ये शा.व्य.समिती अध्यक्ष, संगीताताई बोदलकर व सदस्य, वासुदेव सातपुते, किशोर वाकुडकर, पांडुरंग शेट्ये, संजय सातपुते, लेखाराम हुलके, प्रफुल निरुडवार, शिक्षक वृंद ,पालकवर्ग व विद्यार्थी उपस्थित होते. 
 हा कार्यक्रम मॅजिक बसचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रशांत लोखंडे यांच्या मार्गदर्शनातून व तालुका मार्गदर्शक योगिता सातपुते यांच्या सहकार्यांने घेण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन सी वाय एल भारत कोठारे, वृषभ गुज्जलवार, प्रस्ताविक अश्विनी चुधरी यांनी केले तर आभार प्रदर्शन सी.वाय.एल.प्रशांत कांबळे व युवा मार्गदर्शक देवाजी बावणे यांनी केले.  कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मॅजिक बस कर्मचारी राकेश बारसागडे, आकाश भोयर, आशीष वासेकर, आकाश मडावी, मोनिका भुरसे, गावातील नागरिक, पालक वर्ग, शिक्षक व युवक आदींनी सहकार्य केले .   Print


News - Chandrapur | Posted : 2019-02-10


Related Photos