मांडवघोराड येथे प्रहार जनशक्तीच्या फलकाचे अनावरण


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / वरोरा :
शेतकरी नेते अपंगांचे कैवारी प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अचलपूर विधानसभा क्षेत्रातील एक युवा तडफदार आमदार बच्चू कडू यांच्या विचाराने प्रेरित होऊन वरोरा तालुक्यातील मांडवघोराड या गावातील युवकांनी प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश करून लिलेश ढवस तालुका प्रमुख वरोरा यांच्या हस्ते फलकाचे अनावरण केले. 
 या कार्यक्रमाला शहर प्रमुख वरोरा नितीन नागरकर,प्रहार विध्यार्थी संघटना तालुका अध्यक्ष  गणेश उराडे हे प्रामुख्याने उपस्थित होते. व रात्री ला शिवछत्रपती कला प्रबोधन मंडळ दहेगाव यांच्या समाजप्रबोधन नकलाचा भरगच्च असा कार्यक्रम ठेवला यात स्वप्नील कुथे, गणेश उराडे, सावन कीर्तने, राकेश आत्राम, राहुल सातपुते, शुभम चिकटे या कलाकारांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गाडगे महाराज यांचे विचार लोकांसमोर आपल्या नकलातून मांडून लोकांना मंत्रमुग्ध केले.
 या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रवंदनेने करण्यात आली. या कार्यक्रमाच्या यस्वीतेसाठी प्रहार जनशक्ती पक्ष मांडवघोराड चे शाखा प्रमुख तन्वीर सय्यद, गजानन सहारे, हिरामण आत्राम, दिवाकर जुमनाके, सुनील वैद्य, श्रीराम वैद्य, प्रमोद चौधरी, अमित बहादूरे, संदीप निमरड, बादल मुन, अनिकेत गोबे, राहुल वैद्य, आरिश सय्यद, चेतन लडके, आकाश चहाकाटे, धम्मपाल गायकवाड, रवींद्र गायकवाड, नूतन वैद्य, गोलू झाडे, प्रशांत गायकवाड, संदीप कींनाके, गजानन चांभारे, शुभम झाडे, गजानन झाडे, सचिन भगत, गणेश सहारे, अनिकेत भगत, हनुमान माहुरे, प्रकाश माहुरे, सुरज माहुरे इ. प्रहार सेवक व गावकरी उपस्थित होते.

   Print


News - Chandrapur | Posted : 2019-02-10


Related Photos