आष्टा ग्रामपंचायत येथील महिला बचत गटाचे उपजीविका अभ्यास दौरा संपन्न


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / पोंभुर्णा :
तालुक्यातील स्मार्ट ग्राम म्हणून विजेती ठरलेली “ग्राम पंचायत आष्टा” येथील महिला बचत गटांचे “उपजीविका अभ्यास दौरा”  वर्धा येथील देवरी व वर्धा तालुक्यातील काही गावामध्ये नेण्यात आलेला होता. 
आष्टा व सोनापूर गावामध्ये मागील दिड वर्षापासून सुरु असलेले मुख्यमंत्री ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान या अंतर्गत सदर दौऱ्याचे नियोजन केले गेले होते. महिला बचत गटाचे उद्देश फक्त पैसे गोळा करणे व ते व्याजाने देणे इतकेच नाही तर, गटाद्वारे लघु उद्योग किवा व्यवसाय करणे आहे, हेच उद्देश ग्राम पंचायतीने पुढे ठेऊन महिला सक्षमीकरनासाठी एक विकासात्मक पाउल उचलून, महिलांचे जीवनमान उंचावण्यासाठी व आर्थिक सबलीकरणासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.
सदर उपजीविका अभ्यास दौरा वर्धा येथील देवरी व वर्धा तालुक्यातील काही गावामध्ये नेण्यात आलेला होता. यामध्ये, वायगाव येथील भाकरवळी व्यवसाय, शिंधी मेघे येथील हंडमेड पेपर ब्याग व पत्रावळी आणि द्रोण बनविणे व्यवसाय, लोणी गावातील एल.ई.डी बल्ब बनविणे उद्योग, भिडी (हेटी) येथील गटशेती, कुकुटपालन, शेळीपालन व परसबाग, कवठा झोपडी येथील सोलर प्याणाल व सोलर लाईट असे विविध व्ययसाय व उद्योगांना प्रत्यक्ष भेटी देऊन उद्योग व व्यवसायाबद्दल संपूर्ण माहिती व त्याचे प्रात्यक्षिक समजून घेण्यात आले. तसेच, ग्रामोपयोगी विज्ञान केंद्र, वर्धा येथे भेट देऊन, मधुमक्षिका पालन, टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू करणे, शेतीसाठी विविध खते बनविणे यांची सुद्धा माहिती घेण्यात आली. यामध्ये २९ बचत गटातील अध्यक्ष व सचिव असे एकूण ५८ महिला सहभागी झालेल्या होत्या. 
या अभ्यास दौऱ्याच्या यशस्वीतेसाठी  हरीश ढवस, सरपंच, ग्रा.पं. आष्टा यांनी पुढकार घेतला. तसेच अनिल निखारे, ग्रामसेवक,  देवेंद्र हिरापुरे, मुख्यमंत्री ग्राम परिवर्तक, विद्या पाल, जिल्हा समन्वयक, कल्पना गौरकार उपसरपंच ग्राम पंचायत आष्टा,  निरूता खूजबुरे ग्रा, प, सदस्या, नजमा कुमरे ग्रा, प, सदस्या  ग्रा.सा.प.अ.,  अत्तुलवार , टाटा ट्रस्ट, व ग्राम पंचायत कर्मचारी गणपती दिवसे, आशिष बल्की यांनी मोलाचे कर्तव्य केले.  Print


News - Chandrapur | Posted : 2019-02-10


Related Photos