काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात ५ दहशतवादी ठार, चकमक सुरूच


वृत्तसंस्था / श्रीनगर : दहशतवादी आणि सुरक्षा दल यांच्यात झालेल्या चकमकीत ५ दहशतवादी ठार झाल्याची घटना काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात घडली आहे. या ठिकाणी आणखी काही दहशतवादी लपल्याची शक्यता आहे. लष्कराच्या जवानाने परिसराला चारही बाजुनी वेढले असून चकमक अद्यापही सुरूच आहे.
केल्लम गावात काही दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. ही माहिती मिळताच लष्कराच्या जवानाने परिसरात शोधमोहीम सुरू केली. लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबार केला. भारतीय जवानानेही दहशतवाद्यांच्या गोळीबाराला जोरदार प्रत्युत्तर दिले. लष्काराच्या गोळीबारात ५ दहशतवादी ठार झाले असून आणखी एक ते दोन दहशतवादी लपल्याची शक्यता आहे.
News - World | Posted : 2019-02-10