महत्वाच्या बातम्या

 आधारकार्डवरील पत्ता कितीही वेळा बदला : नाव केवळ दोनदा तर जन्मतारीख एकदाच बदलता येणार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली : बायोमेट्रिक अपडेटसाठी तुम्हाला १०० रुपये द्यावे लागतील, तर डेमोग्राफिक अपडेटसाठी तुम्हाला ५० रुपये द्यावे लागतील. नागरिकत्वाचा एक महत्त्वाचा दस्ताऐवज असलेल्या आधारकार्डवरील आपला पत्ता कितीही वेळा बदलता येतो. नाव केवळ दोनदाच बदलता येते. आधारकार्डवरील तपशिलात बदल करण्यासाठी काही मर्यादा आहेत. याची माहिती समोर आहे.

आधारकार्डमध्ये नाव फक्त दोनदा अपडेट किंवा बदलता येते, तर जन्मतारीख फक्त एकदाच बदलता येते. आधारकार्डवरील पत्ता कितीही वेळा अपडेट करता येतो. आधारवर नमूद केलेले लिंगदेखील अपडेट केले जाऊ शकते. आधारवर नोंदविलेल्या जेंडरमध्ये काही बदल हवा असेल तर त्यासाठी एक वेळची सुविधादेखील आहे.

अचूक मोबाईल नंबर अपडेट करणे आवश्यक

जर तुमचा योग्य मोबाईल नंबर आधार कार्डमध्ये अपडेट नसेल तर आधी तुम्हाला तो अपडेट करण्यासाठी आधारकार्ड केंद्रावर जावे लागेल. जर मोबाईल नंबर अपडेट केला असेल तर तुम्ही ऑनलाइन काही बदल करू शकता. आधार केंद्रावर जाऊन तुम्ही सहज मोबाईल नंबर अपडेट करू शकता.





  Print






News - Rajy




Related Photos