युवा पिढीस समाज सुधारकांनी केलेल्या कार्याबद्दल सतत माहिती देऊन जागृत ठेवले पाहिजे : पालकमंत्री ना. आत्राम


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : अभ्यासक तसेच पालकांनी युवा पिढीस समाज सुधारकांनी केलेल्या कार्याबद्दल सतत माहिती देऊन जागृत ठेवले पाहिजे असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास, वने राज्यमंत्री तसेच पालकमंत्री ना. राजे अम्ब्रीशराव महाराज आत्राम यांनी केले.
काल ९ फेब्रुवारी रोजी आदिवासी विकास व वने राज्यमंत्री तथा गडचिरोली चे पालकमंत्री ना. राजे अम्ब्रीशराव महाराज यांच्या उपस्थितीत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले,राजमाता जिजाऊ आणि माता रमाई आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते उद्घाटक म्हणून बोलत होते.
पुढे बोलताना ना. आत्राम म्हणाले, सद्य स्थितीत असलेला भारत देश आज ज्या प्रगती पथावर आहे. त्यामध्ये समाज सुधारकांची महत्वाची बाजू आहे. त्यांनी जनतेच्या उद्धारासाठी अपार हाल आणि अपमान सहन करून सामाजिक क्रांती घडविली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने दिलेल्या मुलभूत हक्कांमुळेच मी सुद्धा आज आपल्या समोर उभा राहून बोलू शकतो. त्यामुळे मी त्यांचा शतशः ऋणी आहे. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष भन्ते बुद्धापाल थेरो होते. तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
News - Gadchiroli | Posted : 2019-02-10