महत्वाच्या बातम्या

 बल्लारपूर : ३५० वा शिवराज्यभिषेक निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / बल्लारपूर : शहरात उद्या ३५० वा शिवराज्यभिषेक निमित्त विविध कार्यक्रम चे आयोजन २ जून रोजी करण्यात आले आहे.  
रणरागिणी हिरकणी फाउंडेशन ढोल ताशा पथक व युवा मंच तर्फे विविध कार्यक्रम चे आयोजन नगर परिषद चौक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या जवळ केले आहे. त्यात सकाळी ७.०० वाजता जलभिषेक व दूधभिषेक, प्रमुख पाहुणे चा उपस्थितीत मालार्पण व आरती होणार. सायंकाळी ६.०० वाजता ढोल ताशांच्या वादन करणार. तसेच शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित सामान्य ज्ञान स्पर्धा होणार आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos