भामरागड तालुक्यात अस्वलांच्या हल्ल्यात युवक गंभीर जखमी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / भामरागड :
  तालुक्यातील अतिदुर्गम फुलनार गावातील युवकावर दोन अस्वलांनी हल्ला केल्यामुळे युवक जखमी झाल्याची घटना आज ९ फेब्रुवारी रोजी घडली. रामा वड्डे ( ३२) असे जखमी युवकाचे नाव आहे. 
 भामरागड तालुक्यातील ग्रामपंचायत कोठी अंतर्गत येणाऱ्या अतिदुर्गम फुलनार गावातील ३२ वर्षीय तरुण कोतवाल  रामा वड्डे हा शेताकडे जात होता. शेताकडे जाणारा रस्ता हा घनदाट जंगलाचा आहे. अचानक दोन अस्वलांनी त्याच्यावर काही कळायच्या आत हल्ला केला. दोन अस्वल व राम वड्डे यांच्यात झुंज सुरु झाली. मात्र रामाने सर्व बळ एकवटून अस्वलांपासून स्वतः ची सुटका केली व पळतच गाव गाठले. रक्तबंबाळ रामाला त्वरीत गावकऱ्यांनी ग्रामीण रुग्णालय भामरागड येथे दाखल केले. मानेवर व खांद्यावर ठिकठिकाणी जखमा झालेल्या असून त्याच्यावर ग्रा.रु.भामरागड येथे उपचार सुरु आहे. घटनेची माहिती वनविभागाला कळविण्यात आली आहे. त्यामुळे वनविभागाने  सदर घटनेची  चौकशी करुन त्वरित आर्थिक मदत द्यावी अशी मागणी होत आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-02-09


Related Photos