चामोर्शी उपविभागातील पोलीस पाटील व कोतवाल पद भरती प्रक्रियेला स्थगिती मिळणार


-  आमदार डॉ देवराव होळी यांची मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे मागणी
- लवकरच चौकशी होऊन दोषींवर कार्यवाही होणार
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /  गडचिरोली :
  चामोर्शी तालुक्यातील उपविभागीय कार्यालय अंतर्गत नुकत्याच घेण्यात आलेल्या पोलिस पाटील व कोतवाल पदभरती प्रक्रियेत गैरव्यवहार झाला असल्याचे निदर्शनास आल्याने सदर प्रक्रियेला तात्काळ स्थगिती द्यावी अशी मागणी आमदार डॉ देवराव  होळी यांनी राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना मुंबई येथे निवेदन देऊन  केली आहे.
गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील चामोर्शी तालुक्यातील उपविभागीय कार्यालय अंतर्गत पोलिस पाटील व कोतवाल पदभरती घेण्यात येत आहे. या  संदर्भात गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ देवराव होळी यांच्याकडे नागरिकांनी भरती प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याबाबत तक्रार केली. याची दखल घेऊन आमदार डॉ देवराव  होळी यांनी राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची भेट घेतली  व चर्चा करून त्यांना याबाबत माहिती दिली. 
 लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अधिकाऱ्यांच्या बदल्या प्रस्तावित असतांना अशी भरती प्रक्रिया  घेणे चुकीचे असल्याचे सांगितले आहे. एवढेच नाही तर यात मोठया प्रमाणात आर्थिक व्यवहार होत असल्याचे काही गावांमधून पुढे आल्याने या  प्रक्रियेला स्थगिती देऊन तात्काळ  रद्द करण्याची मागणी त्यांनी केली  आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-02-09


Related Photos