महत्वाच्या बातम्या

 भंडारा पंचायत समितीत खरीप हंगामपूर्व सभा संपन्न


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : लवकरच खरीप हंगामाची सुरूवात होणार आहे. या निमित्याने भंडारा तालुक्यातील निविष्ठा विक्रेते, (बियाणे, खते, किटकनाशके) वितरक, साठवणूक केंद्र धारक, पुरवठा व उत्पादक प्रतिनिधी यांना कायद्याचे ज्ञान व्हावे तसेच त्यांचे अधिकार व जबाबदाऱ्यांची जाणीव करुन देण्यासाठी तालुका कृषी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगामपूर्व सभेचे आयोजन पंचायत समिती भंडारा येथे करण्यात आले होते.

या सभेला गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक तथा कृषी अधिकारी व्ही.एम. चौधरी, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण अधिकारी प्रदीप म्हस्कर, तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले, ईफको कंपनीचे क्षेत्रीय अधिकारी श्रेयश महल्ले, विस्तार अधिकारी (कृषी) अजय गजभिये, डी.आर. साखरे यांच्यासह निविष्ठा विक्रेते उपस्थित होते.

गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक चौधरी यांनी कायद्याचे ज्ञान अवगत करुन देत बियाणे, खते व किटकनाशके विक्री करतांना घ्यावयाची काळजी यासह पॉस मशिनवरूनच खत विक्री करण्याबाबत सूचना दिल्या. जिल्हा गुणवत्ता नियंत्रण अधिकारी प्रदीप म्हस्कर यांनी परवानाच्या अनुषंगाने करावयाची कार्यपध्दती याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी देखील सखोल मार्गदर्शन केले.





  Print






News - Bhandara




Related Photos