युवक गणेश मंडळ गंजवार्ड तर्फे गणेश जयंती उत्साहात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : 
दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा गणेश जयंती निमित्य युवक गणेश मंडळ गंजवार्ड यांच्या तर्फे गणेश प्रतिमा ठेऊन त्याचे पूजन सर्वोदय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अशोक जीवतोडे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.   या मंडळाच्या वतीने गणेश जयंती निमित्य दरवर्षी मसाले भात वाटप करण्यात येत असते.  त्याच प्रमाणे यावर्षी सुद्धा वार्डातील प्रतिष्ठीत नागरिकांच्या हस्ते मसाले भात वाटप करण्यात आले. यावेळी शेकडो नागरिकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला.
  गंजवार्ड युवक गणेश मंडळाच्या वतीने फक्त गणपती उत्सव हाच साजरा करत नसून वर्षात येणारे अनेक उत्सव त्यांनी मंडळाच्या जागेवर पोळा, होळी यासारखे मोठ मोठे उत्सव साजरे करीत असतात. हे गणेश मंडळ एक प्रसिद्ध गणेश मंडळ म्हणून प्रसिद्ध आहे. या मसाले भात व गणेश पूजन कार्यक्रमा प्रसंगी बबन बांगडे, छगनसिंह यादव, दीपकसिंह गवालपंची, सुधीर माजरे, विशू गवालपंची, करण गवालपंची, संतोष बांगडे, प्रवीण बावणे, अजय बच्चूवार, श्रीराम वासेकर, अक्षय घुबडे, गोलू, नपु, तिवारी, राहुल नामपल्लीवार, आनंद आगलावे यांच्यासह मंडळातील कार्यकर्ते व वार्डातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.  Print


News - Chandrapur | Posted : 2019-02-09


Related Photos