महत्वाच्या बातम्या

 आजचे दिनविशेष


१ जून महत्वाच्या घटना

१७९२ : केंटुकी अमेरिकेचे १५वे राज्य बनले.

१७९६ : टेनेसी अमेरिकेचे १६वे राज्य बनले.

१८३१ : सरजेम्स रॉस यांनी पृथ्वीच्या चुंबकीय उत्तर ध्रुवाचे स्थान निश्चित केले.

१९२९ : विष्णुपंत गोविंद दामले, शेख फत्तेलाल, व्ही. शांताराम व केशवराव धायबर यांनी प्रभात फिल्म कंपनीची कोल्हापूर येथे स्थापना केली.

१९३० : मुंबई व पुणे दरम्यान दख्खनची राणी (Deccan Queen) ही रेल्वेगाडी सुरू झाली.

१९४५ : टाटा मूलभूत संशोधन संस्थेची (टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च) स्थापना झाली.

१९५९ : द. गो. कर्वे पुणे विद्यापीठाचे तिसरे कुलगुरू झाले.

१९६१ : अमेरिकेतील फेडरल कम्युनिकेशन्स कमिशन (FCC) ला जगात सर्वप्रथम स्टिरीओ एफ. एम. प्रसारणासाठी परवानगी मिळाली.

१९९६ : भारताचे ११वे पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी सूत्रे हाती घेतली.

२००१ : नेपाळचे राजे वीरेंद्र, राणी ऐश्वर्या यांच्यासह अकरा जणांची युवराज दीपेंद्र यांनी निर्घृण हत्या केली.

२००३ : चीन मधील महाप्रचंड थ्री गॉर्जेस धरणात पाणी साठवण्यास सुरुवात झाली.

२००४ : रमेशचंद्र लाहोटी भारताचे ३५वे सरन्यायाधीश यांनी सूत्रे हाती घेतली.

१ जून जन्म

१८४२ : पहिले भारतीय सनदी अधिकारी (ICS) सत्येंद्रनाथ टागोर यांचा जन्म. (मृत्यू: ९ जानेवारी १९२३)

१८४३ : फिंगरप्रिंटिंग चे जनक हेन्री फॉल्स यांचा जन्म. (मृत्यू: २४ मार्च १९३०)

१८७२ : मराठी कवी नारायण मुरलीधर गुप्ते ऊर्फ कवी बी यांचा जन्म. (मृत्यू: ३० ऑगस्ट १९४७)

१९०७ : जेट इंजिन विकसित करणारे फ्रँक व्हाईट यांचा जन्म. (मृत्यू: ९ ऑगस्ट १९९६)

१९२६ : अमेरिकन अभिनेत्री मेरिलीन मन्रो यांचा जन्म. (मृत्यू: ५ ऑगस्ट १९६२)

१९२९ : हिन्दी चित्रपट अभिनेत्री फातिमा रशिद ऊर्फ नर्गिस दत्त यांचा जन्म. (मृत्यू: ३ मे १९८१)

१९४७ : मॅक्लारेन ग्रुप चे संस्थापक रॉन डेनिस यांचा जन्म.

१९६५ : इंग्लिश बुद्धिबळपटू नायगेल शॉर्ट यांचा जन्म.

१९७० : हिंदी चित्रपट अभिनेता आर. माधवन यांचा जन्म.

१९८५ : भारतीय क्रिकेटपटू दिनेश कार्तिक यांचा जन्म.

१ जून मृत्यू

१८३० : भारतीय धार्मिक नेते स्वामीनारायण यांचे निधन. (जन्म: ३ एप्रिल १७८१)

१८६८ : अमेरिकेचे १५ वे राष्ट्राध्यक्ष जेम्स बुकॅनन यांचे निधन. (जन्म: २३ एप्रिल १७९१)

१८७२ : न्यूयॉर्क हेरॉल्ड चे स्थापक जेम्स गॉर्डन बेनेट यांचे निधन. (जन्म: १ सप्टेंबर १७९५)

१९३४ : प्रसिद्ध नाटककार आणि विनोदी लेखक श्रीपादकृष्ण कोल्हटकर यांचे निधन. (जन्म: २९ जून १८७१)

१९४४ : आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार महादेव विश्वनाथ धुरंधर यांचे निधन. (जन्म: १८ मार्च १८६७)

१९६० : जर्मन-ऑस्ट्रियन बहीण पॉड हिटलर यांचे निधन. (जन्म: २१ जानेवारी १८९६)

१९६२ : दुसर्‍या महायुद्धात शेकडो ज्यू लोकांची कत्तल करणार्‍या अ‍ॅडॉल्फ आइकमॅन या जर्मन सेनापतीला इस्त्रायलमधे फाशी देण्यात आले.

१९६८ : अंध मूकबधिर असूनही कला शाखेची पदवी मिळवलेल्या पहिल्या व्यक्ती आणि समाजसेविका हेलन केलर यांचे निधन. (जन्म: २७ जून १८८०)

१९८४ : हिंदी-मराठी चित्रपट अभिनेते नाना पळशीकर यांचे निधन.

१९८७ : दिग्दर्शक, पटकथाकार आणि लेखक के.ए. अब्बास यांचे निधन. (जन्म: ७ जून १९१४)

१९९६ : भारताचे ६वे राष्ट्रपती, लोकसभेचे ४ थे सभापती, केंद्रीय मंत्री व आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री नीलमसंजीव रेड्डी यांचे निधन. (जन्म: १९ मे १९१३ – इलुरू, तामिळनाडू)

१९९८ : ज्येष्ठ साहित्यिक गो. नी. दांडेकर यांचे निधन. (जन्म: ८ जुलै १९१६)

१९९९ : होव्हर्क्राफ्ट चे निर्माते शोध ख्रिस्तोफर कॉकेरेल यांचे निधन. (जन्म: ४ जून १९१०)

२००० : एकपात्री कलाकार मधुकर महादेव टिल्लू यांचे निधन.

२००१ : नेपाळचे राजे वीरेन्द्र यांची हत्या. (जन्म: २८ डिसेंबर १९४५)

२००२ : दक्षिण अफ्रिकेचा क्रिकेट कप्तान हॅन्सी क्रोनिए यांचे विमान अपघातात निधन. (जन्म: २५ सप्टेंबर १९६९)

२००६ : लोकसत्ता देनिकाचे माजी संपादक आणि पत्रकार माधव गडकरी यांचे निधन.





  Print






News - todayspecialdays




Related Photos