महत्वाच्या बातम्या

 जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर पुरस्काराचे वितरण


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : महिला व बाल विकास विभागाच्यावतीने देण्यात येणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जिल्हास्तरीय पुरस्काराचे वितरण जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्याहस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले.


यावेळी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रशांत विधाते, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी माधुरी भोयर आदी उपस्थित होते. महिला व बाल विकास विभागाच्यावतीने महिला व बाल विकास क्षेत्रात उत्कृष्ठ काम करणाऱ्या महिला व संस्थांना राज्य, विभाग व जिल्हास्तरावर दरवर्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. सन 2013-14 च्या पुरस्कारासाठी रेखा मनोहरराव किटे व सन 2014-15 च्या पुरस्कारासाठी डॉ. संगिता संजयराव धनाढ्य यांची निवड करण्यात आली होती.
सदर पुरस्काराचे वितरण जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्याहस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह तसेच रोख दहा हजार रुपयाचा धनादेश देऊन करण्यात आले. डॉ. संगिता धनाढ्य यांच्यावतीने स्मिता बढिये यांनी पुरस्कार स्विकारला.


महिला व बालकांच्या विकासासाठी समाजकार्यात रेखा किटे व डॉ. धनाढ्य यांचे मोठे योगदान लाभत आहे. त्यांच्या या योगदानामुळे समाजाला दिशा मिळेल, अशा शब्दात राहुल कर्डिले यांनी त्यांना शुभेच्छा देऊन त्यांनी महिलांच्या व बालकांच्या कल्याणासाठी पुढेही असेच कार्य करत राहावे, यासाठी प्रशासनाच्यावतीने मदत लागल्यास करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.


गेल्या 20 वर्षांपासून महिलांवर होणाऱ्या अत्याचाराला वाचा फोडून त्यांना न्याय मिळावा सोबतच बालकांचे कल्याण तसेच दारुबंदी मध्ये सक्रीय सहभाग नोंदवून महिलांना न्याय देण्याचे कार्य केले असल्याचे रेखा किटे यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले. कार्यक्रमाला महिला व बाल विकास विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.





  Print






News - Wardha




Related Photos