मैत्री व तेजस यांची स्केटींग स्पर्धेत आतंरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा :
हरियाणा राज्यातील गुरुग्राम येथे ३ फेब्रुवारी रोजी ८ व्या राष्ट्रीय गोल्ड रोलर स्केटींग चॅपियनशिप २०१९ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत हिंदनगर येथील कु. मैत्री प्रमोद ताकसांडे व तेजस बोरकर यांनी सुवर्ण पदक पटकावले असुन त्यांची निवड थायलंड येथे होणा-या आंतराष्ट्रीय
स्तरावरील स्पधेकरीता झाली आहे. सदर आंतरराष्ट्रीय स्पर्धा थायलंड येथे ११ ते १३ मे  या दरम्यान होणार आहे.
स्पर्धेमध्ये निवड झाल्याने सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे. मैत्री प्रमोद ताकसांडे व तेजस बोरकर गांधी सिटी पब्लीक स्कूलचे विद्यार्थी असून त्यांनी आपल्या यशाचे श्रेय आई वडील व प्रशिक्षक विद्यपाल नाईक यांना दिले आहे.  Print


News - Wardha | Posted : 2019-02-09


Related Photos