महत्वाच्या बातम्या

 माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी गर्कपेठा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बांधकामासाठी केली ५० हजार रुपयांची आर्थिक मदत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / सिरोंचा : सिरोंचा तालुक्यातील गर्कपेठा येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळा बांधकाम करण्यासाठी तेथील गावकऱ्यांना आर्थिक मदतीची अत्यंत गरज होती, ही बाब अहेरी इस्टेटचे दानशूर राजे तथा गडचिरोली जिल्हा माजी पालकमंत्री राजे अंम्ब्रिशराव आत्राम यांच्या कानी पडताच त्यांनी गर्कपेठा येथील गावकऱ्यांना बोलावून ५० हजार रुपयाची आर्थिक मदत केली.

आज लोकांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यांची आणि विचारांची माहिती व प्रेरणा मिळावी. या उद्देशाने हा पुतळा एक केंद्र बिंदू बनेल, आपल्या देशाचे संविधान रचयिते, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की, आपल्या अंगात एक सकारात्मक ऊर्जा संचारते आणि आजच्या युवा पिढीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आपल्यात रुजवावे आणि आपली प्रगती करावी आपले आणि आपल्या देशात, आपल्या जिल्ह्याचे नाव लौकिक करावे, असे मत यावेळी राजे अंम्ब्रिशराव आत्राम यांनी गर्कपेठा येथील गावकऱ्यांना बोलून दाखवले.

यावेळी माजी सरपंच सोमय्या दुर्गम, रवि दुर्गम, राजकुमार जाडी, सुधाकर कुम्मारी, कोला वेलादी, रजशेकर दुर्गम, तिरूपती, किरण दुर्गम, श्रावण दुर्गम व गर्कपेठा येथील गावकरी आणि युवा वर्ग उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos