जांभुळखेडा गावाजवळ दुचाकीला अपघात : दोन जण जखमी , एक गंभीर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / कुरखेडा  :
  कुरखेडा - कोरची मार्गावर जांभुळखेडा गावाजवळ असलेल्या वळणावर आज ८ फेब्रुवारी रोजी  दुपारी दीड वाजताच्या सुमारास दुचाकी घसरल्याने  झालेल्या अपघातात दोन दुचाकीस्वार जखमी झाले. यात एकजण गंभीर जखमी  आहे. 
  हरीशंकर शाहू (३५) रा.  रांगी व बारीकराव मडावी रा.भाकरोंडी अशी जखमींची नावे असून त्यांना कुरखेडा येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी गडचिरोली सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे.  यामध्ये हरीशंकर शाहू यांची प्रकृती चिंताजनक  असल्याचे समजते. 



  Print






News - Gadchiroli | Posted : 2019-02-08






Related Photos