अज्ञात वाहनाच्या धडकेने शेतकरी ठार, नागरीकांनी केले चक्काजाम आंदोलन


- आरोपीस अटक व शेतकरी कुटूंबास आर्थिक मदत देण्याची मागणी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / विरूर (स्टे.) :
वरूर - विरूर स्टे.  मार्गावर सिर्सी गावाजवळ अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत शेतकरी ठार झाला. या घटनेनंतर नागरीकांनी चक्कामाज आंदोलन सुरू केले असून तेलंगणा राज्यातून राजुराकडे होत असलेली वाहतूक बंद करण्यात आली आहे.
हिरामण विठोबा धानोरकर (५५) रा. चिचबोडी असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे. हिरामण धानोरकर हे आपल्या मुलासोबत बैलगाडीत तणस भरून मार्गाने जात होते. दरम्यान अज्ञात वाहनाने त्यांना चिरडले. सदर घटना आज सकाळी ११.३०  वाजताच्या सुमारास घडली. या घटनेनंतर नागरीकांनी घटनास्थळी चक्काजाम आंदोलन सुरू केले. महाराष्ट्र - तेलंगणा दरम्यानची वाहतूक रोखून धरली. प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले. उपविभागीय पोलिस अधिकारी शेखर देशमुख, तहसीलदार डाॅ. होळी यांनी घटनास्थळी धाव घेत नागरीकांना समजाविण्याचा प्रयत्न केला. आरोपी वाहनचालकास वाहनासह पकडून मृतक शेतकऱ्याच्या  कुटूंबीयांना आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी नागरीकांनी केली आहे.

   Print


News - Chandrapur | Posted : 2019-02-08


Related Photos