ताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल्पात १ फेब्रुवारीपासून सुरू केलेली नाईट सफारी बंद करा


- सोशल ॲक्शन फाॅर रूरल डेव्हलपमेंटचे वनसंरक्षकांना निवेदन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर :
ताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात १ फेब्रुवारीपासून नाईट सफारी सुरू करण्यात आली आहे. परंतु रात्री वाढणारा प्राण्यांचा वावर, त्यांचे खासगी जीवन व नैसर्गिक अधिवास क्षेत्र धोक्यात येण्याची शक्यता आहे. यामुळे प्राण्यांना पोषक वातावरण राहत नाही. यामुळे नाईट सफारी बंद करण्यात यावी, अशी मागणी सोशल ॲक्शन फाॅर रूरल डेव्हलपमेंट चंद्रपूरच्या वतीने ताडोबा अंधारी व्याप्र प्रकल्प चंद्रपूरचे वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
नाईट सफारी सुरू राहिल्यास जंगलाशेजारील गावांकडे वन्यप्राणी कुच करतील. यातून मानव व वन्यजीव संघर्ष वाढण्याची भिती आहे. यामुळे नाईट सफारीचा निर्णय मागे घ्यावा, अशी. मोहर्ली वनपरीक्षेत्र, खडसंगी वनपरीक्षेत्र व बफर वनपरीक्षेत्रातील पेट्रोलिंग बंद करण्यात यावी. दुचाकी व हलके वाहन, कार, जिप, बस, ट्रक किंवा लाॅरी यांना आकारण्यात आलेल्या शुल्काबाबत फेर विचार करावा व पर्यटनासंदर्भात  कुठलाही निर्णय घेताना एलएसी कमिटीला विचारात घ्यावे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

   Print


News - Chandrapur | Posted : 2019-02-08


Related Photos