शिष्यवृत्ती परीक्षेच्या वेळेत बदल


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : 
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा २४ फेब्रुवारी २०१९ रोजी राज्यातील सर्व जिल्हयामध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार आहे. अखिल भारतीय सैनिकी शाळा प्रवेश पुर्नपरीक्षा ही सुध्दा २४ फेब्रुवारी रोजी घेण्यात येणार आहे. दोन्ही परीक्षा एकाच दिवशी येत असल्याने विद्यार्थ्यांना दोन्ही परीक्षा देता याव्यात याकरीता पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा या एकाच दिवशीच होईल. तथापि परीक्षेच्या वेळेत बदल करण्यात येईल.
पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा पेपर क्र. १ दिनांक २४ फेब्रुवारी २०१९ रोजी दुपारी १ ते २. ३० वाजेपर्यंत व पेपर क्र. २ दुपारी ३. ३०  ते ५ वाजेपर्यंत होईल. शिष्यवृत्ती परीक्षा व अखिल भारतीय सैनिकी शाळा प्रवेश पुर्नपरीक्षेचे परीक्षा केंद्र अशा दोन्ही परीक्षा केंद्रावर घेण्याची व्यवस्था परीक्षा परिषदेकडून करण्यात आलेली आहे. त्यानुसार सदर विद्यार्थ्यांनी त्यांच्या सोयीनुसार दोन्हीपैकी एका परीक्षा केंद्रावर प्रवेशपत्राच्या दोन प्रतीसह परीक्षेस उपस्थित राहून परीक्षा द्यावी.
सदर बदलाबाबत सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी कळविले आहे.  Print


News - Bhandara | Posted : 2019-02-08


Related Photos