प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी पात्र शेतकरी कुटुंबीयांनी तलाठ्यांकडे माहिती दयावी : शेखर सिंह


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे . यामध्ये दोन हेक्टर किंवा त्यापेक्षा कमी धारणाक्षेत्र असणाऱ्या शेतकरी कुटूंबाला प्रति वर्षी ६ हजार रुपये आर्थिक सहाय्य तीन टप्यात उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकरी कुटुंबीयांनी त्यांची अद्यावत माहिती तलाठ्यांकडे उपलब्ध करुन देण्याचे आवाहन  जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेतून केले आहे . 
सदर योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हास्तरीय समिती , तालुकास्तरीय समिती व ग्रामस्थरावर समिती गठित करण्यात आली असून तलाठी हा त्या समितीचा प्रमुख आहे. ग्रामसेवक, कृषि सहाय्यक, सेवा सहकारी संस्थेचे सचिव हे ग्रामस्तरावरील समितीचे सदस्य आहेत . ग्रामस्थरावरील सदर समिती पात्र कुंटूबांची निश्चिती करणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी यांनी त्यांच्या कुंटूबांची माहिती अद्यावत करुन घेणे आवश्यक आहे. यामध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांचे बचत बॅक खाते, बँक आयएफसी कोड , आधार क्रमांक, (आधार क्रमांक नसल्यास वाहन अनुज्ञप्ती , मतदार फोटो ओळखपत्र,  नरेगा कुटुंब ओळखपत्र यापैकी एक ) दूरध्वनी क्रमांक इत्यादी बाबीचा समावेश आहे . 
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना हि ज्या कुटुंबाचे सर्व ठिकाणचे मिळून लागवडीलायक क्षेत्र एकूण कमाल धारण क्षेत्र २ हेक्टर पर्यंत असेल त्यांना अनुज्ञेय आहे . पात्र कुटुंबामध्ये पती , पत्नी व १८ वर्षाखालील मुलाचा समावेश आहे . पात्र शेतकऱ्यांनी बचत बँक खाते द्यावे, या योजनेंतर्गत काही अडचणी असल्यास ग्रामस्तरीय समितीशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे . 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-02-08


Related Photos