अतिक्रमण मुक्त पांदण रस्त्यांच्या कामांना २० गावात सुरुवात - शैलेश नवाल


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा :
जिल्हयात सन २०१७ पासुन अतिक्रमण मुक्त पांदण रस्ता मोहिमे अंतर्गत जिल्हयात ३०० किमी. चे पांदण रस्ते अतिक्रमण मुक्त करण्यात आले आहे. पावसाळा आणि शेतात पिक असल्यामुळे सदर कामे तात्पुरत्या स्वरुपात जुलै ते ऑक्टोबर या कालावधित थांबविण्यात आली होती. मात्र आता सदर कामांना २० गावात सुरुवात करण्यात आली असून शेतक-यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले आहे.
अतिक्रमण मुक्त झालेल्या पांदन रस्त्यावर पुन्हा अतिक्रमन होऊ नये यासाठी पांदन रस्त्यांना विशिष्ट कोड देऊन त्याची नोंद ठेवण्यात येत आहे. जिल्हयात आतापर्यंत ३०५. ८३ किमी लांबीचे २०७ पांदण रस्ते अतिक्रमण मुक्त करण्यात आल्यामुळे शेतक-यांना वहिवाटीसाठी रस्त्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.
त्याचबरोबर ४३८ हेक्टर शेती लागवडी खाली आली आहे.  Print


News - Wardha | Posted : 2019-02-08


Related Photos