गोंदिया तहसील कार्यालयातील दोन नायब तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गोंदिया :
मलमा वाहतूक करणाऱ्या टिप्परवर दंडाची कार्यवाही न करता सोडून दिल्याचा मोबदला म्हणून १५ हजारांची लाच स्वीरकारताना गोंदिया तहसील कार्यालयातील दोन नायब तहसीलदार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत.
राजश्री राजाराम मल्लेवार (४४) आणि तिलकचंद टिकराम बिसेन (५५) अशी लाचखोर नायब तहसीलदारांची नावे आहेत. ६ फेब्रुवारी रोजी नायब तहसीलदार राजश्री मल्लेवार यांनी तक्रारदाराच्या मलमा वाहतूक करणाऱ्या टिप्परवर दंडाची कारवाई न करता सोडून दिले. याचा मोबदला म्हणून २७ हजार ५०० रूपये लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदाराने एसीबीकडे धाव घेतली.
तक्रारीची शहननिशा करून काल ७ फेब्रुवारी रोजी सापळा रचण्यात आला. कारवाईदरम्यान नायब तहसीलदार राजश्री मल्लेवार, तिलकचंद बिसेन यांनी सल्लामसलत करून १५ हजारांची लाच स्वीकारली. यावरून गोंदिया शहर पोलिस ठाण्यात कलम ७ (ब),  ७ (अ)  लाचलुचपत प्रतिबंधक (संशोधन)  अधिनियम २०१८ नुसान गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक राजेश दुद्दलवार यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपअधीक्षक रमाकांत कोकाटे, पोलिस हवालदार प्रदिप तुळसकर, राजेंद शेंद्रे, नापोशि रंजित बिसेन, डिगांबर जाधव, राजेंद्र बिसेन, महिला पोलिस शिपाई वंदना बिसेन, गिता खोब्रागडे, चालक देवानंद मारबते यांनी केली आहे.

   Print


News - Gondia | Posted : 2019-02-08


Related Photos