महत्वाच्या बातम्या

 पुण्यानुमोदनानिमित्त्य समाज प्रबोधन


- दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचा उपक्रम

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी /  कोरची : कोरची येथून छत्तीसगड राज्याच्या सीमेवर वसलेल्या मौजा कोटरा तालुका कोरची येथे बाबुराव बाजीराव सहारे यांच्या पुण्यानुमोदन कार्यक्रमाच्या निमित्ताने दिनांक २८ मे २०२३ रोजी दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या पुढाकाराने समाज प्रबोधन करण्यात आले. 

कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे विभागीय अध्यक्ष विजय बंसोड तर, मुख्य मार्गदर्शक म्हणून प्रसिद्ध साहित्यिक उषाकिरण आत्राम तर प्रमुख अतिथी म्हणून राधाताई नांदगाये उपविभागीय उपाध्यक्षा, तालुकाध्यक्ष आनंदराव मेश्राम, कार्याध्यक्ष चंद्रशेखर अंबादे, सामाजिक कार्यकर्ते विलास गावंडे आदी मान्यवर उपस्थित होते.

बाबुराव बाजीराव सहारे यांच्या पुण्यानुमोदनाच्या कार्यक्रमाच्या वेळी उपविभागीय उपाध्यक्ष राधाताई नांदगाये यांचे द्वारा परित्राणपाठ घेण्यात आले. परित्राण पाठांतर प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेल्या उषाकिरण आत्राम यांनी बाबुराव बाजीराव सहारे यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकत उपस्थित जनसमुदायास मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणातून विजय बंसोड यांनी अशा घरगुती लहान मोठ्या कार्यक्रमांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध यांचे विचार समाजात पसरवण्यासाठी समाज प्रबोधन होत राहावे असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल उमरे यांनी तर सहारे परिवारातर्फे उपस्थित मान्यवरांचे, आप्तेष्टांचे व उपस्थित नागरिकांचे आभार एडवोकेट दिनेशकुमार सहारे यांनी मानले . कार्यक्रमाच्या वेळी आप्तेष्ट व प्रमुख उपस्थितीमध्ये मौजा बंजारी छत्तीसगढ राज्य येथील समता सैनिक दलाचे सैनिक व कमांडो उपस्थित होते आणि  गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos