महत्वाच्या बातम्या

  धान्य खरेदी तात्काळ सुरू करा अन्यथा घरात भरलेले धान्य राष्ट्रीय महामार्गावर ठेवून चक्काजाम करू : शेतकरी परिषदेचा ईशारा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / कोरची : पावसाळा तोंडावर येवून ठेपला आहे. शेतकरी उन्हाळी हंगामातील धान्य आपापल्या घरी ठेवले आहे. खरीप हंगामाची तयारी करावी की उन्हाळी हंगामातील धान्याची विल्हेवाट लावावी. अशा द्विधा मनस्थितीत शेतकरी सापडला आहे. त्यामुळे आदिवासी महामंडळ, आदिवासी विविध कार्यकारी संस्था आणि शासनाने शेतकऱ्यांचे धान्य तात्काळ खरेदी करावे अन्यथा आपापल्या घरी साठवून ठेवलेला धान्य घेऊन राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलन सुरू करु. असे शेतकरी परिषदेचे अध्यक्ष नंदकिशोर वैरागडे यांनी सांगितले आहे. 

आधारभूत धान्य खरेदी करणाऱ्य आवाका संस्था यापूर्वी खरेदी प्रक्रियेत धान्याची तुट १ % तर प्रती क्विंटल खरेदी वर ३१.२५ रुपये मंजूर होते. मात्र खरेदी हंगाम २०२२-२३ पासून खरेदी प्रक्रियेत धान्याची तुट अर्धा टक्का तर प्रती क्विंटल खरेदी वर २०.४० रुपये करण्यात आले आहे. त्यामुळे आविका संस्थांवर अन्याय झाला आहे. जिल्ह्यात आदिवासी उपयोजना क्षेत्रात शासनाने आधारभूत धान्य खरेदी योजना राबविण्याकरीता अभिकर्ता म्हणून आदिवासी विकास महामंडमहामंडळाची नेमणूक केली आहे. परंतु प्रत्यक्ष धान्य खरेदी प्रक्रिया सब अभिकर्ता म्हणून आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था राबवितात. 

यासाठी संस्था मनुष्यबळ आणि मालाची साठवणूक करण्याकरिता गोडावूनची व्यवस्था करते. खरेदी केलेल्या धान्याची वेळीच उचल न झाल्याने धान्यात घट होते. त्याकरीताच १ टक्का तुट मंजूर करण्यात आली होती. तसेच खरेदी प्रक्रिया राबविण्यासाठी ३१.२५ रूपये मंजूर करण्यात आले होते.

जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत धान्य खरेदी प्रक्रिया राबविण्यात येणार नाही अशी भूमिका घेण्यात आली आहे. 

त्यामुळे शेतकऱ्यांचे धान्य घरात साठवून ठेवण्यात आले आहे. 

शेतकरी हा महत्त्वाचा अंग आहे. शेतकऱ्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होता कामा नये. आदिवासी विविध कार्यकारी संस्था शासनाशी झगळावे. आपल्या मागण्यांसाठी सर्व काही करावे. परंतु शेतकऱ्याला वेठीस धरू नये. 

जर आविका, महामंडळ, शासन शेतकऱ्यांचे धान्य तात्काळ खरेदी करणार नसल्यास शेतकरी परिषद आपापल्या घरी साठवून ठेवलेले धान्य घेऊन राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलन करु असा इशारा दिला आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos