भामरागडमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील शाळा निर्मितीच्या आशा पल्लवीत


- मुल्यांकन पथकाची समुह निवासी शाळेला भेट
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / भामरागड :
आंतरराष्ट्रीय शाळा मुल्यांकन पथकाने भामरागड येथील समुह निवासी शाळेला नुकतीच भेट दिली. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती आणि सर्व शिक्षकांशी चर्चा केली. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील शाळा निर्मितीची आशा पल्लवित झााली आहे.
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत राज्यात १४ ऑक्टोबर २०१६  च्या शासन निर्णयानुसार १०० शाळा आंतरराष्ट्रीय स्तरावरील करण्याचे उद्दिष्ट ठरविले आहे. आंतरराष्ट्रीय शाळा निर्मितीसाठी महाराष्ट्र विद्या प्राधिकरण पुणे मार्फत लिंक उपलब्ध करून देण्यात आली होती.  त्या अनुषंगाने भामरागडच्या गटशिक्षणाधिकारी अश्विनी सोनवणे यांच्या मार्गदर्शनात आंतरराष्ट्रीय शाळा निर्मितीसाठी समुह निवासी शाळा भामरागडची लिंक भरण्यात आली. तसेच सर्व शाळा व्यवस्थापन समिती व शाळेतील सर्व शिक्षक यांची सिंहगड लोणावळा येथे दोन दिवशीय चर्चासत्र संपन्न झाले.
शाळा तपासणीकरीता काल पथक भामरागडमध्ये दाखल झाले. ज्येष्ठ अधिव्याख्याता प्रशांत डवरे, राज्य सल्लागार प्रतिक राजुरकर व विषय सहाय्यक निलकंठ शिंदे यांपी भेट देवून चर्चा केली. प्रश्नावली भरून घेतली. परिसराची पाहणी करून समस्या जाणून घेतल्या. कागदपत्रांची पाहणी केली. दरम्यान केंद्रप्रमुख गोमासे, विषयसाधनव्यक्ती चांगदेव सोरते, वांढरे, तुलावी, जगणे, पठाण, मुख्याध्यापक अवथरे, शाळेचे शिक्षक मोदक दब्बा, रापर्तीवार, बोरकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शंकर महाका, सदस्य पठाण, चैतु गावडे उपस्थित होते.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-02-07


Related Photos