महत्वाच्या बातम्या

 व्यसन हा आजार, उपचाराने बरा होतो : ३१ मे तंबाखू विरोधी दिन 


- ३१ मे तंबाखू विरोधी दिनानिमित्त विशेष लेख


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : तंबाखूची साथ ही आरोग्यावर आलेले सर्वात मोठे संकट आहे. गुटखा आणि तंबाखू खाल्याने तोंडाचा कर्करोग होतो, हे आपण लहानपणापासून ऐकत आहोत. गावात, शहरात, राज्यात, देशात आणि जगभरात याबद्दल जनजागृती केली जाते. सिगारेटच्या पाकिटावर देखील कर्करोगाची भयानकता दर्शवणारे चित्रही प्रसिद्ध करण्याचे बंधन आरोग्य विभागाने घातले असून त्याचेही काटेकोर पालन होते. मात्र, तंबाखू खाण्याऱ्यांचे आणि सिगारेट ओढणाऱ्यांचे प्रमाण कमी होतांना दिसून येत नाही. या व्यसनामुळे नागरिक स्वतःहून कर्करोगासारख्या आजाराला निमंत्रण देतांना दिसून येतात. क्षणभराच्या नशेसाठी आणि तलफ भागवण्यासाठी तंबाखू, सिगारेटच्या आहारी जाणाऱ्या मंडळींमुळे कुटुंबाचे किती नुकसान होते, ही बाब आकलनापलीकडची आहे.


जगामध्ये दरवर्षी जवळपास 63 लाख लोकांचा मुत्यू हा तंबाखू सेवनाने होतो. भारतात दररोज 2 हजार 500 व्यक्तींचा मृत्यू तंबाखूमुळे होतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या अभ्यासानुसार सन 2030 पर्यंत 80 लाखांपेक्षा जास्त लोकांचा मुत्यू हा तंबाखू सेवनामुळे होण्याचे भाकीत केले आहे. एक बिडी किंवा सिगारेट ओढल्यामुळे संबधित व्यक्तीचे आयुष्य हे साडेपाच मिनिटांनी कमी होते. हे सर्वेक्षणातुन वैद्यकीय तज्ज्ञांनी याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. त्यावर उपाय म्हणून भारत सरकारने राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम सुरू करण्यात आला असून संपूर्ण जगामध्ये 31 मे हा दिवस तंबाखू विरोधी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.
भारतात तंबाखू सेवनाने दरवर्षी दहा लाख लोकांना मुख कर्करोग होतो. यातील एक तृतीयांश लोकांना मृत्यूस सामोरे जावे लागते. यावर्षी तंबाखू विरोधी दिनानिमित्त जागतिक आरोग्य संघटनेने ‘आपल्याला अन्नाची गरज आहे, तंबाखूची नाही’ ही संकल्पना राबविण्याचे जाहीर केले आहे.


तंबाखू सेवनाने शारीरिक दुष्परिणाम : तंबाखू सेवनाने तोंडाची व केसांना दुर्गधी येते. तंबाखूजन्य पदार्थ सेवनाने दात सडत जातात. हिरड्यांना इजा होते व दात निकामी होऊन त्यांची मजबुती नष्ट होते. दातांवर चॉकलेटी-पिवळे डाग पडतात. वास घेण्याची क्षमता कमी होते. चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात. शरीरात अशक्तपणा येतो. हाडे ठिसूळ होतात व रोग प्रतिकारक शक्ती कमी होऊ लागते. डोळ्यांमध्ये जळजळ होते. तंबाखूमुळे तोंड, स्वरयंत्र, फुफ्फुस, गळा, अन्ननलिका, मूत्राशय, मुत्रपिंड, नाक, पोट, गर्भाशय व मुखाचा कर्करोग होतो. पुरुषांच्या शुक्राणूंची संख्या कमी होत जाते. ज्या स्त्रिया तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करतात त्यांची प्रजनन शक्ती कमी होते व स्त्रियांमध्ये वंधत्व निर्माण होते.


तंबाखू सेवन थांबविण्याचे फायदे : आरोग्य संपन्न जीवन, शारीरिक क्षमतेत वाढ, आत्मविश्वासात वाढ होते. व्यसन व उपचारांवरील होणाऱ्या खर्चाची बचत होते. घरातील सदस्य आणि आजुबाजूच्या मित्र परिवारास, पॅसिव्ह स्मोकिंगमुळे होणाऱ्या आजारांचा धोका कमी होतो. आपले कुटुंब सुखी व आनंदी बनते तसेच पर्यावरण आणि राष्ट्रीय संपत्तीचे संरक्षण होते.

 

तंबाखू सोडण्यासाठी उपयुक्त युक्त्या : तंबाखू सोडण्याच्या तारखेची घोषणा आपल्या कुटुंबियांसमोर, नातलगासमोर किंवा मित्रांसमोर करा. तंबाखू सेवनास प्रवृत्त करतील अशा लोकांपासून दूर रहा. जेव्हा तंबाखू सेवनाची इच्छा होते, तेव्हा 1 ते 100 अंक मोजणे, प्राणायाम वैगेरे कृती करा. चणे, शेंगदाणे, बडीशेप इत्यादी पदार्थाचे सेवन करावे. तंबाखू सेवनामुळे शरीरात अस्तित्वात असणारी विषारी रसायने बाहेर टाकण्यासाठी पाणी भरपूर प्रमाणात प्यावे.


जिल्हा सामान्य रुग्णालयात राबविण्यात येणारे विविध कार्यक्रम : रुग्णांना समुपदेशन करणे. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या, तिसऱ्या व चौथ्या बुधवारला कर्करोग शिबिर आयोजित करण्यात येते. शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांच्या दातांची तपासणी व समुपदेशन करुन तंबाखू मुक्त शाळा केली जाते.
31 मे, 2023 रोजी तंबाखू विरोधी दिनानिमित्त सार्वजनिक आरोग्य विभाग जिल्हा रुग्णालय, भंडारा व इंडियन डेन्टल असोशिएशन तर्फे मौखिक आरोग्य तपासणी व शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिपचंद सोयाम यांनी केले आ





  Print






News - Bhandara




Related Photos