महत्वाच्या बातम्या

 दुचाकीसह केला १,६७,२०० रुपयाचा माल जप्त : स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई 


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : २७ मे २०२३ रोजी गोपनिय माहितीच्या आधारे रात्रोच्या दरम्यान मौजा विहीरगाव येथील चौकात सापळा रचुन अवैधरीत्या देशी व विदेशी दारुची वाहतुक करणारे ईसम लाखबिरसिंग बावरी व भुषण मेश्राम यांना ताब्यात घेतले असता, त्यांचेकडे ८७,०००/- रु. किमीचा देशी व विदेशी दारु, दारु वाहतुक करण्याकरीता वापरलेली ६०,०००/- रुपये किमतीची दुचाकी तसेच २०,०००/- रु. किमतीचा मोबाईल असा एकुण १,६७,२०० /- रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आल्याने त्यांचे विरुध्द पोस्टे देसाईगंज येथे गुन्हा नोंद करण्यात आला. सदर गुन्ह्राचा तपास सुरु आहे. 


सदरची कारवाई पोलीस अधीक्षक गडचिरोली नीलोत्पल तसेच अपर पोलीस अधीक्षक कुमार चिंता तसेच पोनि उल्हास भुसारी, स्थागुशा यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि राहुल आव्हाड यांचे नेतृत्वात पोना/अकबर पोयाम, पोशि/प्रशांत गरफडे, पोशि/श्रीकृष्ण परचाके, पोशि/श्रीकांत बोईना, चापोना/शगीर शेख यांनी पार पाडली.





  Print






News - Gadchiroli




Related Photos