महत्वाच्या बातम्या

 स्थानिक गुन्हे शाखेनी जप्त केला साडेसहा किलो गांजा


- ७ लाख १९ हजार ६९० रु. किमतीच्या मुद्देमालासह तीन आरोपी जेरबंद

विदर्भ न्यूज एक्सप्रेस

प्रतिनिधी / गडचिरोली : २७ मे २०१३ रोजी गोपनिय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे वरीष्ठांच्या परवानगीने रात्रीचे दरम्यान मौजा इंदिरानगर येथील वनउपज तपासणी नाक्यावर लावलेल्या नाकाबंदी दरम्यान (१) आशिष धनराज कुळमेथे (२८), रा. संजयनगर, चंद्रपुर ता. जि. चंद्रपुर, (२) धनराज मधुकर मेश्राम (३३), रा. नेहरुनगर, चंद्रपुर ता. जि. चंद्रपुर, (३) ज्योती श्रीकृष्ण परचाके (२२), रा. शास्त्रीनगर, चंद्रपुर ता. जि. चंद्रपुर यांच्या ताब्यातील वाहन क्रमांक एम.एच.३४ बी.आर. १०८६ ची पंचासमक्ष तपासणी केली असता, वाहनाचे डिक्कीत एकूण ९९ हजार ६९० रुपये किमतीचा ६.६४६ कि.ग्रॅ. गांजा, ६ लाख रु. किमतीचे चारचाकी वाहन तसेच २० हजार रुपये किमतीचे मोबाईल असा एकुण ७ लाख १९ हजार ६९० रू. किंमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने सदरचा जंगली पदार्थ (गांजा), गोबाईल तसेच गांजा वाहतुकीकरीता वापरलेले स्विफ्ट चारचाकी वाहन जप्त करून नमुद आरोपीतांविरुद्ध पोस्टे गडचिरोली येथे गंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ नियम (एन.डी.पी.एस.) अन्वये करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस स्टेशन गडचिरोली येथील मपोउपनि संघमित्रा दांकरीत गुन्हा नोंद असून आरोपीतांना न्यायालयासमक्ष हजर केले असता, न्यायालयाने सदर आरोपीतांचा ३१ मे २०१३ पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजुर केला असुन सदर गुन्ह्याचा तपास सुरु आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक, गडचिरोली नीलोत्पल तसेच अपर पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. उल्हास भुसारी यांचे नेतृत्यात मसपोनि. रुपाली पाटील, पोहचा/ नरेश सहारे, पोहवा / हेमंत गेडाम, पोना / सतिश कत्तीवार, पोना / राकेश सोनटक्के, पोशि/ उमेश जगदाळे, पोशि/सचिन घुबडे, पोशि/ माणिक दुधबळे, मपोहवा / लक्ष्मी बिश्वास, मपोहवा / सविता उसेंडी, चापोना / माणिक निसार, चापोना / मनोहर टोगरवार यांनी पार पाडली.





  Print






News - Gadchiroli




Related Photos