महत्वाच्या बातम्या

 तीन दिवसांचे मुख्य न्यायमूर्ती धानुका यांनी घेतली शपथ


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश रमेश देवकीनंदन धानुका हे केवळ तीन दिवसांचे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती असणार आहेत. त्यांना आज राजभवन येथे राज्यपाल रमेश बैस यांनी मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ दिली.

उच्च न्यायालयात सर्वोच्च पदावर असलेल्या न्यायमूर्तींचा हा आतापर्यंतचा सर्वात कमी कार्यकाल असणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमच्या शिफारशीनुसार तत्कालीन मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांची ११ डिसेंबर २०२२ रोजी सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती झाल्यानंतर पाच महिन्यांपासून मुंबई उच्च न्यायालयात कायमस्वरूपी मुख्य न्यायमूर्ती पद खाली होते. दरम्यान, केंद्र सरकारने शुक्रवारी न्यायमूर्ती रमेश धानुका यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी नियुक्ती केली आहे. त्यानुसार राज्यपालांनी आज  २९ मे २०२३ रोजी त्यांना शपथ दिली.

३१ मे रोजी निवृत्त होणार

उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या निवृत्तीचे वय ६२ वर्षे आहे. तर धानुका ३१ मे रोजी वयाची ६२ वर्षे पूर्ण करत आहेत. त्यामुळे ते केवळ तीन दिवसांच्या कार्यकाळानंतर निवृत्त होणार आहेत.





  Print






News - Rajy




Related Photos