महत्वाच्या बातम्या

 सुशिक्षित बेरोजगारांच्या सेवा सहकारी संस्थांकडून प्रस्ताव आमंत्रित


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था, यांच्याकडील कार्यालयीन काम करण्यासाठी पूर्णवेळ अकुशल कामगार व सफाई करण्याकरिता सफाई कामगार बारा महिन्याच्या कालावधीसाठी दोन कंत्राटी अकुशल कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. तरी इच्छुक व फक्त भंडारा जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्थांनी 12 जून 2023 पर्यंत कार्यालयीन वेळेत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, भंडारा येथे प्रस्ताव सादर करावे, कामाच्या अटी व शर्ती इत्यादीचा सविस्तर तपशील सूचना फलकावर पहावयास उपलब्ध आहे, असे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त यांनी कळविले आहे.





  Print






News - Bhandara




Related Photos