अल्प व अत्यअल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना


-शेतकरी कुटुंबाला मिळणार वार्षिक ६ हजार रुपये
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया :
शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरीता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना नुकतीच जाहिर केली आहे. महाराष्ट्र शासनाच्या कृषि व पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाने ४ फेब्रुवारी २०१९ रोजी परिपत्रकातून सदर योजने बाबत जाहिर केले आहे. अल्प व अत्यअल्प भूधारक शेतकऱ्यांना या योजनेंतर्गत प्रती शेतकरी कुटुंबाला एकुण वार्षिक‍ ६ हजार रुपयाचे अर्थ सहाय्य तीन टप्प्यात शासनामार्फत उपलब्ध करण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी संबंधित विभागांना योजनेची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहे. ज्या शेतकरी कुटुंबाचे सर्व ठिकाणचे मिळून लागवडीलायक एकूण धारण क्षेत्र २ हेक्टर किंवा त्यापेक्षा कमी असेल त्या शेतकरी कुटुंबाना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अनुज्ञेय राहणार आहे. सदर योजने करीता पात्र लाभार्थींचे सर्वेक्षण करण्याकरीता संबंधित विभागांना निर्देश देण्यात आले आहे. या योजनेकरीता शेतकरी हे तहसिल कार्यालय, तलाठी कार्यालय, गट विकास अधिकारी कार्यालय, ग्रामसेवक कार्यालय, तालुका कृषि अधिकारी कार्यालय व कृषि सेवक कार्यालयात संपर्क करु शकतील.
   Print


News - Gondia | Posted : 2019-02-07


Related Photos