मुख्यमंत्र्यांच्या शहरातच बेरोजगार शिक्षकांनी मागितली भीक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : 
 बहुचर्चित शिक्षकभरती नेमकी कधी होणार? किती जागांची होणार? जाहिरात कधी येणार? या ना अनेक प्रश्नांनी बेरोजगार अभी योग्यता धारक शिक्षकांन भेडसाऊन सोडले आहे. एक एक दिवस एक एक वर्षासारखा वाटायला लागला आहे. ज्या शिक्षक भरती साठी डिसेंबर २०१७ मध्ये "शिक्षक अभी योग्यता व बुद्धिमत्ता चाचणी" घेण्यात आली त्याला होऊन १४ महिने होऊन गेले तरी जाहिरात येण्याचा पत्ता नाही. सतत आंदोलन, उपोषणे करत आहे पण या सरकारला काहीच फरक पडत नाही.
 आज डी टी एड बी एड स्टुडंट असोसिएशन, विदर्भ विभाग च्या वतीने संविधान चौक नागपूर येथे एक दिवसीय लाक्षणिक उपोषणासह "पवित्र भीक मांगो आंदोलन" करण्यात आले ज्यात यवतमाळ, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, नागपूर, अमरावती येथील बेरोजगार अभी योग्यता धारक शिक्षकांनी संविधान चौक मध्ये उपोषणासह भीक मागितली. यातून जमा झालेले २७६ रुपये उद्या डिमांड ड्राफ्ट ने "मुख्यमंत्री सहाय्यता निधी" ला पाठविण्यात येईल.
 आंदोलनाच्या माध्यमातुन एक शिष्टमंडळ  शिक्षण उपसंचालक  सतीश मेंढे  यांना निवेदन द्यायला गेले असता त्यांनी दिलेल्या खात्रीशीर माहिती नुसार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या गडचिरोली, गोंदिया, भंडारा आणि चंद्रपूर येथील प्राथमिक च्या मिळून एकूण ५९९ शिक्षकांची रिक्त पदे पवित्र पोर्टल वर अपलोड करण्यात आलेली आहे. वर्धा आणि नागपूर मध्ये जागाच शिल्लक नाही. या सोबतच junior collage च्या nagpur  विभाग मध्ये एकूण ५०४ जागा रिक्त आहे पण त्या अद्याप अपलोड करण्यात आलेल्या नाही.
 शिक्षक भरतीची जाहिरात पोर्टल वर येण्यासाठी नागपूर विभाग मार्फत पूर्ण तयारी करण्यात आलेली आहे.  फक्त संस्थेच्या जागा बिंदू नामावली अद्ययावत करून सुद्धा संस्थाचालक अपलोड करत नाही आहे. पण त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहे असे मेंढे  यांनी सांगितले.  सोबतच शिक्षक भरती ५  मार्च आधी होणार म्हणजे होणार आणि १२ फेब्रुवारी ला जाहिरात येण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्नशील आहे असे सांगितले आणि १० टक्के  सवर्ण आरक्षण शिक्षक भरती मध्ये लागु करण्याबाबत जरी निर्देश आले तरी जाहिरात काढीन १० टक्के  सवर्ण आरक्षण च्या आधीन अशी खाली टीप देण्याबाबत प्रशासना तर्फे बाजू मांडण्यात आलेली आहे.  त्यामुळे याचा फारसा अडथळा होणार नाही असे प्रतिपादन त्यांनी केले.
 विदर्भ विभाग तर्फे करण्यात आलेल्या पवित्र भीक मांगो आंदोलनात  नागपूर जिल्हा अध्यक्ष हरीश येरणे, चंद्रशेखर लांजेवार, रितेश कीतूकले, लोकेश हरिनखेडे, राजू घावले, केदार नाकाडे, मनोज पेटकुले, फुलेश कुंभरे, पंकज घरपिंडे, सचिन सोमनाथे, मुकेश नागरिकर, लवकुश जुवारे, प्रिया मसराम, जितेंद्र गौपले, उत्तम कोरराम, विशाल हेपट, अनिल साठवणे, हेमराज जिभकाटे, रवी हाडगे, प्रवीण झाडे, महेंद्र बोरकर, दीपक मोहितकर, नितीन वाघाडे, जीतेंद्र म्हस्के, मयूर कुकडे, स्वप्नील नरताम, प्रजाग मेश्राम, राहुल कावळे,आशिष भुरसे,विपीन मेशराम, उत्तम रंगारी इत्यादी अभियोग्यता धारक शिक्षक उपस्थित आहे.
 शिक्षक भरतीची दखल आता खुद्द मुख्यमंत्री साहेबांनी घेऊन १२ फेब्रुवारी आधी जाहिरात आणि ५  मार्च आधी नियुक्ती पत्र कसे पात्र उमेदवारांना मिळेल याकडे जातीने लक्ष द्यावे अन्यथा गोर गरीब, कामगार आणि शेतकर्‍यांच  सरकार म्हणू मिरवणारे मुख्यमंत्री यांना जनता माफ करणार नाही.  कारण डीएड , बीएड  करणारे हे उमेदवार शासनाने निर्धारित केलेल्या सर्व पात्रता पूर्ण करून आज शिक्षक बनण्यासाठी तयार आहेत पण सरकारची मानसिकता दिसत नाही की काबाडकष्ट करून ज्याना शिकविले त्या माय बापाचे स्वप्न पूर्ण व्हावे. 

   Print


News - Nagpur | Posted : 2019-02-07


Related Photos