ताडगाव येथे नक्षल्यांनी केली इसमाची हत्या, हत्यासत्र सुरूच


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली
: नक्षल्यांकडून भामरागड तालुक्यातील हत्यासत्र सुरूच असून आज पुन्हा एका नागरीकाची हत्या करण्यात आली आहे. 
आनंदराव मडावी (३३) रा. विसामुंडी असे हत्या करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे. नक्षल्यांनी टाकलेल्या पत्रकात म्हटले आहे की, आनंदराव संतु मडावी याचा वडील आधी पोलिस खबरी म्हणून काम करीत होता. त्याला समजाविण्यात आले होते. मात्र वडीलासारखा आनंदरावसुध्दा पोलिसांचा खबरी म्हणून काम करीत होता. आनंदराव हा २००३ आणि २००६ मध्ये पोलिस भरतीच्या मुलाखतीत नापास झाला होता. यानंतर भामरागडच्या उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांनी एसपीओचे काम दिले होते. नक्षल्यांची माहिती पोलिसांना पुरवित होता, असा आरोप नक्षल्यांनी केला आहे.

मागील काही दिवसांपासून नक्षल्यांनी निरपराध नागरीकांना पोलिस खबरी घोषित करून हत्या करणे सुरू केली आहे. मागील १५ दिवसांच्या काळातील ही आठवी हत्या आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-02-07


Related Photos