१७ फेब्रुवारीला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया :
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्यसेवा पूर्व परीक्षा १७ फेब्रुवारी रोजी गोंदिया येथील गोंदिया पब्लिक स्कूल, बि.एन.आदर्श सिंधी विद्या मंदिर हायस्कूल, राजस्थान कन्या महाविद्यालय आणि ज्युनियर कॉलेज ऑफ आर्टस्, एस.एस.अग्रवाल मुन्सीपल गर्ल्स हायस्कूल, एस.एस.गर्ल्स कॉलेज, मनोहर मुन्सीपल हायर सेकंडरी स्कूल, मनोहर मुन्सीपल हायस्कूल ॲन्ड ज्युनियर कॉलेज, श्रीमती सरस्वतीबाई महिला विद्यालय, साकेत पब्लिक हायस्कूल, रविंद्रनाथ टागोर हायस्कूल, गुरुनानक अपर प्रायमरी स्कूल या परीक्षा केंद्रावर सकाळी १० ते दुपारी १२ व दुपारी ३ ते सायंकाळी ५ या वेळेत दोन सत्रात घेण्यात येणार आहे.
या परीक्षा प्रक्रिये दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ ची कलम १४४ चे मनाई आदेश लागू करण्यात आले आहे. हे आदेश १७ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजेपासून ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत लागू राहील. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरुध्द कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, असे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी हरिष धार्मिक यांनी कळविले आहे.  Print


News - Gondia | Posted : 2019-02-07


Related Photos