८ फेब्रुवारीला स्पर्धा परीक्षा व्याख्यानमाला ‘शोध क्षमतेचा,ग्रामीण ऊर्जेचा’


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया :
जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांच्या संकल्पनेतून जिल्हा प्रशासनाच्या वतीने नाविण्यपूर्ण उपक्रम ‘शोध क्षमतेचा,ग्रामीण ऊर्जेचा’ ही स्पर्धा परीक्षा व्याख्यानमाला सुरु करण्यात आलेली आहे. या व्याख्यानमालेअंतर्गत प्रत्येक महिन्यात दर शुक्रवारला तज्ज्ञ वक्ते/अधिकाऱ्यांमार्फत मार्गदर्शन करण्यात येते.
त्यानुसार आठव्या सत्राचे आयोजन ८  फेब्रुवारी रोजी सकाळी ११ . ३० वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, गोंदिया येथे करण्यात आले आहे. सदर व्याख्यानमालेकरीता गोरेगाव नगरपंचायत मुख्याधिकारी हर्षला राणे व गोठणगाव वनपरिक्षेत्र अधिकारी संजय मेंढे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत.
तेव्हा गोंदिया जिल्ह्यातील विशेषत: ग्रामीण भागातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या/इच्छुक असलेल्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या व्याख्यानमालेचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त, समाज कल्याण गोंदिया यांनी केले आहे.  Print


News - Gondia | Posted : 2019-02-07


Related Photos