गरंजी गावाला सामूहिक वनहक्क प्रदान


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / मुलचेरा :
अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी वन हक्क   नियंम २००६ व नियम २००८ अन्वये गरंजी ग्रामसभेचा बांबू,तेंदू व इतर गौनऊपज वरील सुमारे १७५० हे.आर चा  हक्क कायम करून सामूहिक वनहक्क  गरंजी ग्रामसभेला वनहक्क पट्याच्या स्वरूपात वितरित करण्यात आले. 
सदर सामूहिक वनहक्क पट्टा वितरण कार्यक्रमाचे उद्घाटन   तहसिलदार अनिरुद्ध कांबळे यांनी केले तर अध्यक्षस्थानी स्थानिक ग्रामसभेचे अध्यक्ष संन्याशी हिचामी हे होते.यावेळी व्यासपीठावर प्रामुख्याने नायब तहसिलदार समशेर पठाण, घोटचे वनपरिक्षेत्र अधिकारी शेखर तनपुरे,लालाजी हिचामी, बोलेपल्लीचे तलाठी प्रशांत मेश्राम उपस्थित होते. सामुहिक वनहक्काच्या माध्यमातून ग्रामसभेने आर्थिक उन्नती करून गावाचा विकास करावा व प्रगतीच्या दिशेने वाटचाल करावी असे आवाहन तहसिलदार अनिरुद्ध कांबळे यांनी केले. कार्यक्रमाप्रसंगी गावकऱ्यांच्या वतीने पाहुण्यांचा शाल श्रीफळ देऊन व ढोल ताशांच्या गजरात पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन व आभार  विजय कारखेले यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी स्थानिक ग्रामसभेच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-02-07


Related Photos