कोराडी येथील महाजनको तील सिनियर सेक्युरिटी विरूध्द ५ हजारांची लाच स्वीकारल्यावरून गुन्हा दाखल


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर
: भाडेतत्वावर लावलेल्या वाहनाचे देयक काढून देण्यासाठी ८  हजारांच्या लाचेची मागणी करून ५  हजारांची लाच स्वीकारल्याप्रकरणी महाजनकोतील सिनियर सिक्युरिटीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाळकृष्ण कालिदास कुलकर्णी असे लाचखोराचे नाव आहे.तक्रारदार हे देवीमंदीर रोड महादुला तह. कामठी जि. नागपूर येथील रहीवासी असुन टॅक्सी काॅन्टंक्टरचे काम करतो. २१ मे २०१८ पासुन तक्रारदाराने   महा.ज.न.को कोराडी येथील सुरक्षा विभागात १ गाडी तात्पुरत्या स्वरूपात भांडेतत्वावर लावलेली होती. गाडीचे ऑक्टोबर २०१८ ते जानेवारी २०१९ या ४ महिण्याचे प्रलंबित बिल सादर करण्याकरिता तक्रारदाराने  २  फेब्रुवारी रोजी चौकशी कोड  ८१००३ ने आपल्या के.एम. पाटील फर्म च्या नावाने ऑनलाईन नोंदणी केली.  याआधारे प्रलंबित ४ बिले तक्रारदाराने सादर करण्याबाबत बाळाकृष्ण कालीदास कुलकर्णी  यांच्याशी संपर्क साधला असता त्यावेळी त्याने तक्रारदारास प्रत्येक बिलाचे २ हजार रूपये  याप्रमाणे एकुण ४ बिलाचे ८ हजार रूपये लाचेची मागणी केली.  तक्रारदाराची लाच देण्याची   ईच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूर येथे तक्रार  नोंदविली. 
तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीवरून सापळा कार्यवाहीचे आयोजन केले असता सदर सापळा  कार्यवाही दरम्यान बाळाकृष्ण कालीदास कुलकर्णी  याने तक्रारदारास वरिल कामकरण्याकरिता ८ हजारांची   मागणी करून तडजोडअंती  ५ हजारांची लाच रक्कम स्विकारली. त्यावरून आरोपी विरूध्द पोलीस स्टेशन कोराडी नागपूर शहर येथे लाचलुचपत प्रतिबंध १९८८ संशोधन  अधिनियम २०१८ अन्वये गुन्हा  नोंद करण्यात आला  आहे. 
सदर कार्यवाही  पोलीस उपायुक्त/पोलीस  अधिक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधिक्षक राजेश दुद्दलवार यांच्या मार्गदर्शनात  पोलीस उपअधीक्षक  शंकर शेळके, पो. हवा. प्रविण पडोळे, ना.पो.शि. मंगेश कळंबे, प्रभाकर बले व चालक नापोहवा परसराम शाही सर्व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूर यांनी यशस्वी कामगिरी केली आहे.

   Print


News - Nagpur | Posted : 2019-02-07


Related Photos