७ फेब्रुवारी : आजचे दिनविशेष


– घटना

 १८५६: ब्रिटिशांनी अवध साम्राज्य ताब्यात घेतले. सम्राट वाजिद अली शहा याला तुरुंगात टाकण्यात आले.
१९१५: गंगाधर नरहर ऊर्फ बापुसाहेब पाठक यांनी पुण्यातील आर्यन हे पहिले चित्रपटगृह सुरु केले. तेथे प्रदर्शित झालेला पहिला मूकपट होता हिर्‍याची अंगठी.
१९२०: बाबूराव पेंटर यांच्या महाराष्ट्र फिल्म कंपनी ने तयार केलेला सैरंध्री हा चित्रपट पुण्याच्या आर्यन सिनेमात प्रथम प्रकाशित झाला.
१९४८: कसोटी क्रिकेटमधे शतक झळकवणारा नील हार्वे हा सर्वात लहान ऑस्ट्रेलियन खेळाडू ठरला.
१९६५: मराठी नाटकात प्रथमच फिरत्या रंगमंचाचा वापर सुरू झाला.
१९७१: स्वित्झर्लंडमधे महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला.
१९७४: ग्रेनाडा हा देश युनायटेड किंग्डमपासुन स्वतंत्र झाला.
१९७७: सोवियेत संघाने सोयुझ २४ हे अंतराळयान प्रक्षेपित केले.
१९९९: युवराज अब्दुल्ला जॉर्डनच्या राजेपदी विराजमान.
२००३: क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांना श्री शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला.

– जन्म

१६९३: रशियाची सम्राज्ञी ऍना यांचा जन्म.
१८०४: डियर अँड कंपनीचे संस्थापक जॉन डियर यांचा जन्म. (मृत्यू: १७ मे १८८६)
१८१२: इंग्लिश कादंबरीकार व लेखक चार्ल्स डिकन्स यांचा जन्म. (मृत्यू: ९ जून १८७०)
१८७३: आरएमएस टायटॅनिक जहाजाचे रचनाकार थॉमस अँन्ड्रयूज यांचा जन्म. (मृत्यू: १५ एप्रिल१९१२)
१९०६: रशियन विमानशास्त्रज्ञ अँतोनोव्ह एअरक्राफ्ट कंपनीचे संस्थापक ओलेग अँतोनोव्ह यांचा जन्म. (मृत्यू: ४ एप्रिल १९८४)
१९३४: चित्रपट अभिनेता व निर्माता सुजित कुमार यांचा जन्म. (मृत्यू: ५ फेब्रुवारी २०१०)
१९३८: कम्युनिस्ट नेते एस. रामचंद्रन पिल्ले यांचा जन्म.

– मृत्यू

१३३३:  निचिरेन शोषु बौद्ध धर्माचे संस्थापक निक्को यांचे निधन.
१९३८: अमेरिकन उद्योजक हार्वे फायरस्टोन यांचे निधन. (जन्म: २० डिसेंबर १८६८)
१९९९: जॉर्डनचे राजे हुसेन यांचे निधन. (जन्म: १४ नोव्हेंबर १९३५)



  Print






News - todayspecialdays | Posted : 2019-02-07






Related Photos