नवी दिल्लीत स्वामीनाथन आयोग लागू होणार, केजरीवाल सरकारचा निर्णय


वृत्तसंस्था / नवीदिल्ली : केजरीवाल सरकारने शेतकऱ्यांना आनंदाची बातमी दिली आहे. नवी दिल्लीत स्वामीनाथन आयोग लागू होणार आहे. सोबतच स्वामीनाथन आयोग लागू करणारे दिल्ली पहिले राज्य ठरणार आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही घोषणा केली आहे. यामुळे दिल्लीमधील शेतकऱ्यांना स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार हमीभाव मिळणार आहे.
केजरीवाल यांनी ट्विट करत सांगितलं की,   देशात पहिल्यांदाच स्वामीनाथन आयोग दिल्लीत लागू केलं जाणार आहे’. यासोबतच केजरीवाल यांनी जनतेच्या सूचनांचं स्वागत केलं जाईल असंही सांगितलं आहे.
अरविंद केजरीवाल यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन माहिती देताना, शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत म्हणून गहू या पिकासाठी २६१६ रुपये तर धान्यासाठी २६६७ रुपये किमान आधारभूत किंमत म्हणजे एमएसपी लागू करणार असल्याचे प्रस्तावित आहे, असे म्हटले आहे. तसेच याबाबत जनेतेच्या सूचनांचेही स्वागत केले जाईल, असेही केजरीवाल यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर लिहिले आहे.    Print


News - World | Posted : 2019-02-06


Related Photos