महत्वाच्या बातम्या

 मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / मुंबई : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर हेलिपॅड बांधण्यात येणार आहेत.

या महामार्गाला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात आले आहे. समृद्धी महामार्गावर होणारे अपघात आणि अपघातांनंतर संभाव्य आपत्कालीन परिस्थितींना तोंड देण्यासाठी हेलिपॅड बांधण्यात येणार आहेत. प्रस्तावित आराखड्यानुसार, पहिले हेलिपॅड खर्डी ते इगतपुरी दरम्यान एक्स्प्रेस वेच्या बोगद्या विभागाजवळ असेल, ज्याचे सध्या बांधकाम सुरु आहे.

समृद्धी महामार्गालगत १६ हेलिपॅड बांधण्यात येणार आहेत. समृद्धीवर अपघातांची संख्या वाढत आहे. तेव्हा दुर्घटना घडल्यास जखमींना एअर अ‍ॅम्ब्युलन्सने रुग्णालयात दाखल करता येणे शक्य होईल. जखमींवर तात्काळ योग्य उपचार मिळतील या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आलाय. भविष्यात हेलिपॅडची संख्या वाढवून २२ वर नेण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे.

दरम्यान, MSRDC ने मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर एअर अ‍ॅम्ब्युलन्स सुविधा स्थापन करण्यासाठी प्रयत्न केले होते आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची (NHAI) दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गासाठी अशीच योजना आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन करण्यात आले आहे. मुंबई-नागपूर द्रुतगती मार्ग, शिर्डी आणि भरवीर दरम्यान ८० किमी पसरलेले, जे इगतपुरी आणि नाशिक दरम्यान आहे. या विकासामुळे, ७०१ किमी द्रुतगती मार्गापैकी एकूण ६०० किमीचा रस्ता वाहनांच्या वाहतुकीसाठी उपलब्ध झाला आहे.

नागपूर ते शिर्डी दरम्यानचे उद्घाटन ११ डिसेंबर २०२२ रोजी करण्यात आले. आता भरवीर आणि ठाणे दरम्यानचे उर्वरित १०० किमीचे काम मार्च २०२४ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. त्यानंतर मुंबई ते नागपूर थेट प्रवास करता येणार आहे. तसेच ७१० किमी एक्स्प्रेस वेवर २५० मेगावॅटचा सौरऊर्जा प्रकल्प असणार आहे. तर द्रुतगती मार्गावर २४ ट्रॉमा केअर वाहने आणि एअर अ‍ॅम्ब्युलन्ससाठी हेलिपॅडची सुविधा असणार आहे. एक्सप्रेस वेपर्यंतच्या मध्यभागी १२ लाख झाडे लावणार येणार आहेत.

तर दुसरीकडे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर आता गाड्यांच्या वेगावर लवकरच नियंत्रण येणार आहे. वेगमर्यादेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना तेव्हा चाप बसणार आहे. गाड्यांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी महामार्ग वाहतूक व्यवस्थापन प्रणाली अंतर्गत कामे सुरु झाली आहेत. संपूर्ण एक्स्प्रेस वेवर ९३ ठिकाणी ३७० सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत.अति वेगाने गाडी चालवणाऱ्यांवर तसंच लेनचे उल्लंघन करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करणे सोपे होणार आहे.





  Print






News - Rajy




Related Photos