महत्वाच्या बातम्या

 खासदार बाळुभाऊ धानोरकर यांची प्रकृती बिघडली


- एअर ऍम्ब्युलन्स ने दिल्ली ला रवाना 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / बल्लारपूर : चंद्रपूर - वणी - आर्णी चे खासदार बाळुभाऊ धानोरकर यांची प्रकृती बिघडली असून त्यांना एअर ऍम्ब्युलन्स ने  दिल्ली येथील वेदांता हॉस्पिटल मध्ये उपचार करण्यात येणार आहे. काल नागपूर येथील खाजगी रुग्णालयात किडनी स्टोन वर उपचार केले होते. पर्यंतू आज त्यांच्या पोटात दुखू लागल्याने ते दिल्ली येथील वेदांता हॉस्पिटल येथे जात आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असून कार्यकर्त्यांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन केले आहे. वैद्यकीय सल्ल्यानुसार पुढील काही दिवस तपासणी, उपचार आणि विश्रांती घेणार आहेत. कालच त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. या घाई गडबडीत त्यांच्या पोट दुखू लागले.






  Print






News - Chandrapur




Related Photos