महत्वाच्या बातम्या

 बाल धम्म संस्कार वर्ग संपन्न : बल्लारपूर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / बल्लारपूर : नियमित रविवारी होणारे बाल धम्मवर्ग भिक्षु निवास पाली विद्यालय बुद्ध विहार बल्लारपुर येथे संपन्न झाले. 

धम्ममित्र संपत कोरडे यांनी त्रिशरण पंचशील आणापानसती ध्यान सराव करून घेतला. विहांशु चांदेकर, यक्ष दाहीर यांनी मराठीतून पंचशील दिले आणि यथार्थ खोब्रागडे, प्रज्ञा दारुंडे यांनी विधायक पंचशील दिले. आयु.नंदाताई मून यांनी त्यागमूर्ती रमाई आंबेडकर यांच्या स्मृती दिनानिमित्य रमाई यांचा त्यागा विषयी मार्गदर्शन केले. सृष्टी रामटेके ला वर्ग १२ वी ८० % मार्क घेऊन पास झाल्याबद्दल तिचा सत्कार करण्यात आले. धम्मपालन गाथेने वर्गाची सांगता झाली.





  Print






News - Chandrapur




Related Photos