गोरेवाडा परिसरातील प्राणी संवर्धन केंद्रात बिबट्याने ५ चितळ, ३ काळवीट चौसिंग्याला केले ठार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /  नागपूर :
  एका बिबट्याने ५ चितळ, ३ काळवीट व एक चौसिंग्याला ठार केल्याची घटना आज ६ फेब्रुवारी रोजी   गोरेवाडा भागात असलेल्या प्राणी संवर्धन केंद्रात सकाळी उघडकीस आली. 
सदर बिबट काटोल मार्गावर असलेल्या गोरेवाडा जंगलातून आला असल्याचे सांगण्यात येते. विशेष म्हणजे गोरेवाडा केंद्राला इलेक्ट्रॉनिक्स तारेचे कुंपण असूनही बिबट्याने ते ओलांडून प्रवेश केला व प्राण्यांवर हल्ला चढवला. बुधवारी सकाळी वनकर्मचाऱ्यांच्या ५ चितळ, ३ काळवीट व एक चौसिंग्या ठार झाला असल्याचे  निदर्शनास आले.   Print


News - Nagpur | Posted : 2019-02-06


Related Photos