सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने प्रेमियूगूल विवाह अडकले बंधनात


- मुलीच्या घरच्यांचा विरोध, इंदिरा ग्राम येथील घटना
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / मारेगाव :
चार वर्षांपूर्वी दोघांच्या नजरेने एकमेकांवरील प्रेम कबुल केले. प्रेमाची वीन घट्ट रोवत असतानाच तेवढच बहरत आलेल्या प्रेमाचा शेवट दोघांच्या सहजीवनाचा सकारात्मक प्रवास करण्याचे प्रेमीयुगूलांनी ठरविलं. पण त्यापूर्वी कुटूंबातील वडीलधाऱ्यांना विश्वासात घेवून हा सहजीवन सोहळा करायचा मनोदय असताना मुलीच्या घरच्या मंडळींनी सक्त विरोध केला. हे लग्न होणारच नाही ही कुणकूण सतावत असताना प्रेमीयुगूलांनी थेट मारेगाव पोलिस ठाण्यात आपबिती सांगितली. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत प्रेमाला उपमा नाही, हे देवाघरचे देणे म्हणत प्रेमीयुगूलांना विवाह बंधनात अडकविले. यामुळे दोघांच्याही चेहऱ्यावर समाधान झळकत होते.
आदिवासी बहूल असलेल्या सातशे लोकवस्तीच्या इंदीराग्राम येथील  रविंद्र टेकाम (२६) व अनिता आत्राम (२१) यांचे प्रेमप्रकरण चार वर्षांपासून बहरत असताना दोघांनीही एकत्र जीवन जगण्याच्या आणाभाका घेतल्या. मात्र दोघांच्या कुटूंबातील थोर व्यक्तींच्या आशिर्वादाने विवाह बंधण्यात अडकण्याचा या प्रेमवीरांचा सकारात्मक विचार मुलीच्या कुटुंबीयांनी धुडकावून लावला. नव्हेतर हे लग्नच होवू शकत नसल्याची भूमिका घेतली. प्रेमाला प्रचंड विरोध केला. इकडे दोघांच्या प्रेमाची कालवाकालव सुरू झाल्याने चार वर्षांच्या प्रेमावर करडी नजर ठेवणार्या विरोधकांकडून प्रेमाची घडी विस्कटण्याची गंभीर स्थिती निर्माण झाली. मात्र या प्रेमातील प्रियकराच्या साथीस साथ देणारी प्रेमवेडी काहीही झाले तरी मी त्याचीच होणार असे ठरवून थेट मारेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते राजु मोरे, इमरान शेख, लक्ष्मण चावके, देवा बोबडे, विष्णू वानखेडे, पंकज नेहारे, कपील कुळमेथे, भदू गेडाम यांच्याशी संपर्क केला. या सर्वांनी सामाजिक भान राखत प्रेमीयुगूलांना स्थानिक शंकर देवस्थानात आणून विवाह लावून दिला. दोघांनी आयुष्यभर एकत्र राहण्याच्या संकल्पनेवर शिक्कामोर्तब करीत बंधनात अडकले. दोघेही इंदीराग्राम येथे रवाना झाले. यावेळी उपस्थितांनी दोघांनाही सहजीवनाच्या शुभेच्छा दिल्या.

   Print


News - Rajy | Posted : 2019-02-06


Related Photos