महत्वाच्या बातम्या

  कोनसरी प्रकल्पग्रस्तांना, बेरोजगारांना लोह प्रकल्प परिसरातील ग्रामपंचायतीनी सहकार्य करावे


- कोनसरी येथील नागरिकांची मागणी 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : कोनसरी येथील लोह प्रकल्प अनेक मुद्द्यावरती नेहमी चर्चेत असतांना दिसत आहे. यावर सर्वांनी गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. 

सुरुवातीपासूनच कोनसरी येथील नागरिक सदर कंपनी आपल्या परिसरात व्हायला पाहिजे यासाठी प्रयत्नशील होते. ज्या वेळेस लायड मेटल ॲन्ड एनर्जी लिमिटेड या कंपनीला प्रकल्पासाठी जागा हवी होती. तेव्हा कोनसरी परिसरातील गावांणी जमिनीचे दर १० ते १५ लाख रुपये एकर याप्रमाणे मागितले. तेव्हा कंपनीने इतरत्र जागा बघण्यास सुरवात केली. अशा वेळेस हा प्रकल्प आपला परिसर सोडता इतर कुठल्याही ठिकाणी जाऊ नये व परिसरातील बेरोजगारांना रोजगार मिळवा, या उद्देशाने कोनसरी गावातील शेतकऱ्यांनी कंपनीने ठरविलेल्या रेट प्रमाणे म्हजेच ५ लाख रुपये प्रती एकर या दरात कंपनीला जमिन दिल्या. तेव्हा सदर प्रकल्प कोनसरी गावात उभा राहीला आणि कोनसरी परिसरातील सुशिक्षित कुशल/अकुशल बेरोजगारांना रोजाराची संधी प्राप्त झाली. 

आता जेव्हा रोजगार निर्माण होत आहे, तेव्हा भुमिधारक शेतकरी व गावातील स्थानिक बेरोजगार यांना प्रधान्याने रोजगार मिळायला पाहिजे. नंतर कोनसरी परिसरातील इतर ग्रामपंचायत मधील बेरोजगारांना आतापर्यंत कंपनीमधे फक्त कोनसरी मधील २०% टक्के कुशल/अकुशल बेरोजगारांना रोजगार देऊ शकली आहे. कारण कंपनीने एकीही युनिट आतापर्यंत सुरु झालेला नाही. अशा परिस्थितीत गावातील प्रकल्प ग्रस्त शेतकरी व सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळेल या आशेने कंपनीकडे लक्ष देऊन आहेत. अशा परिस्थितीत कोनसरी परिसरातील इतर ग्रामपंचायतीने कंपनी विरोधात रोजगारासाठी आताच मोर्चा काढणे योग्य नाही. 

त्याकरिता कोनसरी ग्रामपंचायतीकडुन मागणी करण्यात येत आहे की, असा कुठलाही प्रकार करू नये, कोनसरी वासी विरोधात नाही तर सोबत आहेत. ग्रामपंचायत मधील बेरोजगारांना रोजगार मिळावा अशी ठाम भूमिका आहे. त्याच कारणाने आताच ग्रामपंचायत मधून जागा भरल्या जात आहेत. तसेच गावातील स्कील बेस सुशिक्षित बेरोजगारांना किंवा लेबर म्हणून (सप्लाय) मध्ये काम करणाऱ्या बेरोजगारासाठी सुरवातीपासूनच कोनसरी ग्रामपंचायतीने कुठलेही प्रकारचे बंधन घातलेले नाही. त्यामुळेच इतर ग्रामपंचायत मधून प्रकल्पात ७०% टक्के लेबर (सप्लाय) काम करीत आहेत. अशा परिस्थीतीमध्ये कोनसरी ग्रामपंचायत मधील बेरोजगारांचा हक्क हिरावुन कंपणीवर मोर्चा स्वरूपात दबाव आनने हे कितपत बरोबर आहे. यावर विचार करावा.

२६ मे २०२३ ला कोनसरी ग्रामपंचायतीने नागरीकाच्या उपस्थीतीमध्ये ठराव घेऊन असे म्हटले आहे की, जर आपण मोर्चा करीत असाल तर नायलाजाने आपल्या विरोधात उभे राहावे लागेल. तरी ग्रामपंचायतिमधील संबंध खराब होणार नाही व तनाव वाढणार नाही, याची काळजी घेण्यात यावी. अशी कोनसरी ग्रामपंचायत सहकार्याच्या भूमिकेत आहे.

यावेळी श्रीकांत पावडे सरपंच, रतन आक्केवार उपसरपंच, गीता गद्दे सदस्य, सुनीता कोवे सदस्य, राकेश दंडिकवार सदस्य, विजय सिडाम सदस्य, सविता आत्राम सदस्य, वैशाली करपते- सदस्य, ललिता मोहुर्ले सदस्य व समस्त कोनसरी येथील भुमिधारक शेतकरी व गावातिल नागरिक उपस्थित होते. 





  Print






News - Gadchiroli




Related Photos