२०१५ - १६ च्या कृषी जनगणनेत नाव असलेल्या शेतकऱ्यांनाच मिळणार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ


वृत्तसंस्था /  नवी दिल्ली : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक ६ हजारांची मदत केली जाणार असल्याचे अर्थसंकल्पात अर्थमंत्री  पीयूष गोयल यांनी जाहीर केले.   या मदतीसाठी केंद्र सरकारनं काही अटीही ठेवल्या आहेत.  २०१५ - १६ च्या कृषी जनगणनेत ज्यांची नावं आहेत, त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे.
लहान आणि किरकोळ शेतकरी कुटुंबातील व्यक्ती या योजनेचे लाभार्थी ठरणार आहेत. ज्यामध्ये पती-पत्नी आणि १८ वर्षांपर्यंतच्या अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. तसेच ते सर्व सामूहिकरीत्या दोन हेक्टर म्हणजे ५ एकर जमिनीवर शेती करत असावेत. अशाच कुटुंबातील सदस्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांचं नाव १  फेब्रुवारी २०१९ पर्यंत सातबाऱ्यावर असणार आहे, तेसुद्धा लाभार्थी ठरणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सरकारी नोकरी, माजी मंत्री, जवान, जिल्हा पंचायत अध्यक्ष, केंद्र आणि राज्य सरकारमधले अधिकारी ज्यांची पेन्शन १० हजार आहे, अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. व्यावसायिक, डॉक्टर, इंजिनीअर, सीए, आर्किटेक्ट शेती करत असले तरी त्यांना लाभार्थी समजलं जाणार नाही. या योजनेचा फायदा मिळवण्यासाठी कृषी विभागात नोंदणी करावी लागणार आहे. प्रशासन त्या नोंदणीची खातरजमा करणार आहे. परंतु त्यासाठी आवश्यक कागदपत्रे द्यावी लागणार आहेत. ज्यात सातबारावरच्या नोंदणीत जमीन मालकाचं नाव, सामाजिक वर्गीकरण(अनुसूचित जाती/जमाती), आधार नंबर, बँक अकाऊंट नंबर, मोबाईल नंबर द्यावा लागणार आहे.    Print


News - World | Posted : 2019-02-06


Related Photos