पोलिस भरतीत लेखी परीक्षेनंतर रिक्त पदांच्या आवश्यकतेनुसारच उमेदवारांची शारीरीक चाचणी


- भरती प्रक्रिया जलदगतीने पार पाडणार
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
पोलिस शिपाई भरतीसाठी सुधारीत सेवा प्रवेश नियम लागू करण्यात आले असून उमेदवारांची प्रथम लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांपैकी पोलिस घटक कार्यालयाच्या आस्थापनेवर रिक्त होणाऱ्या पदांच्या प्रमाणात आवश्यक तेवढ्याच योग्य उमेदवारांना शारीरीक चाचणीसाठी बोलाविण्यात येणार आहे. यामुळे भरती प्रक्रिया जलद गतीने होणार आहे.
महाराष्ट पोलिस दलातील पोलिस कर्मचार्यांच्या कामाच्या स्वरूपात बदल झालेला असल्याने पोलिस शिपाई पदावर बुध्दीमान उमेदवारांची निवड होण्याची आवश्यकता आहे. पोलिस शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेतील शरीरीक चाचणी दरम्यान होणार्या दुर्घटनांची बाब विचारात घेवून शासनाने भरती प्रक्रियेत बदल केला आहे. नवीन नियमानुसार उमेदवारांना जास्त दिवस ताटकळत रहावे लागणार नाही. याचा उमेदवारांना फायदा होईल, असे पोलिस विभागाने म्हटले आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-02-06


Related Photos