चालकाचे नियंत्रण सुटल्याने बांबू भरलेला ट्रक घरावर पलटला, जीवितहानी टळली , जि.प. उपाध्यक्षांची घटनास्थळी भेट


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /  अहेरी : 
 तालुक्यातील आलापल्ली येथे काल भामरागड वरून येत बांबू भरून येत असलेला ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे थेट रस्त्यालगतच्या घरावर पलटला. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. 
 एच ३१ - ६४८१ क्रमांकाचा  ट्रक बांबू भरून येताना मन्नेवार कॉलनी जवळ चालकाचे नियंत्रण सुटले.  यामुळे रस्त्याच्या बाजूला असलेल्या आविस कार्यकर्ते राजू कोमपल्ली यांच्या घरावर ट्रक पलटी झाला. या घटनेत  जीवित हाणी झाली नाही. मात्र  घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच  आविस नेते जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडालवार  यांनी  घटनास्थळी भेट दिली व राजू कोमपल्ली यांच्याशी चर्चा केली.   यावेळी माजी सरपंच दिलीप गंजीवर,अग्रवाल , जुलेख शेख,  संजय मंथनवर,  प्रभाकर मडावी , राकेश सडमेक , लक्ष्मण आत्राम सह नागरिक उपस्थित होते.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-02-06


Related Photos